• Download App
    DMK candidate काँग्रेसने लढविली आयडियेची कल्पना; तामिळनाडूतल्याच द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याच्या हाती बांधला पराभवाचा गंडा!!

    काँग्रेसने लढविली आयडियेची कल्पना; तामिळनाडूतल्याच द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याच्या हाती बांधला पराभवाचा गंडा!!

    नाशिक : जगदीप धनखड यांच्या बरोबर “राजकारण” खेळून त्यांना उपराष्ट्रपती पदावरून घालविण्याचा “पराक्रम” करणाऱ्या काँग्रेसने आता पुढचा “डाव” टाकला असून ओढवून घेतलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपल्या पक्षातून उमेदवार देण्यापेक्षा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्याला उमेदवार बनवून त्याच्या हाती पराभवाचा बांधायचा घाट घातल्याची राजकीय वस्तुस्थिती समोर आली. DMK candidate

    – त्याचे झाले असे :

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सरप्राईज देत माध्यमांनी चर्चेत आणलेली सगळी नावे बाजूला सरकवून वेगळ्याच नावाला प्राधान्य दिले. त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल पण मूळचे तामिळनाडूचे असलेले नेते सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरविले. राधाकृष्णन यांचे नाव समोर आल्याबरोबर तामिळनाडूचे राजकारण तापले. सी. पी‌. राधाकृष्णन हे संघ बॅकग्राऊंडचे ओबीसी नेते आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजपला लाभ व्हावा म्हणून उपराष्ट्रपती पदासाठी त्यांची निवड केली, अशा अटकळी माध्यमांसह अनेकांनी बांधल्या. त्या जाहीरपणे व्यक्त देखील केल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करून सी. पी. राधाकृष्णन यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागितला. त्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना फोन करून तशीच विनंती केली.



    या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मात्र राजनाथ सिंह यांना कोणताही “शब्द” न देता स्वतःचीच राजकीय खेळी पुढे केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तसाही विरोधकांच्या उमेदवारांचा पराभव होणार असेल, तर आपण आपला कुठलाही उमेदवार उभा करण्यापेक्षा विरोधकांपैकी दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार उभा करावा म्हणजे एकीकडे निवडणूक लढविल्यासारखे होईल, लोकशाहीचा अधिकार वापरल्यासारखे होईल, एक वातावरण निर्मिती करता येईल आणि आपल्या पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा राजकीय बळी देखील जाणार नाही, असा “पोक्त” राजकीय विचार काँग्रेसच्या “उच्चदर्जीय” बुद्धिमत्ता असलेल्या नेत्यांनी केला.

    – द्रमुक नेत्याच्या हाती पराभवाचा गंडा

    जर भाजपने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत लाभ मिळविण्यासाठी तामिळनाडूतल्या नेत्याला उमेदवारी दिली असेल, तर आपणही तामिळनाडू मधल्याच दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडून भाजपवर “मात” करावी, असा “उच्चदर्जीय” राजकीय विचार काँग्रेसने द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाच्या गळी उतरविला. द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार तिरुची शिवा यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार करू, असे सांगितले. द्रविड मुन्नेत्र कळघमने देखील सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाला विरोध नाही, पण भाजपच्या विचारसरणीला विरोध आहे म्हणून उपराष्ट्रपती पदासाठी आपल्या नेत्याची उमेदवारी मान्य करण्याचे ठरविलेले दिसले.
    त्यामुळे तिरूची शिवा यांच्या निवडणुकीत पराभव करून त्यांना येडं बनविल्याचेही स्पष्ट झाले.

    जगदीप धनखड यांच्या विरोधात काँग्रेसने मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती उमेदवारी दिली होती. संख्याबळ नसल्याने त्यावेळी त्यांचा पराभव अटळ होता. त्यांचा पराभव झाला. पण यावेळी काँग्रेसने स्वतःच्या कुठल्याही नेत्याच्या हातावर पराभवाचा गंडा बांधायचा नाही असे ठरविले. त्याऐवजी प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचा हाती पराभवाचा गंडा बांधला. काँग्रेसने हा राजकीय डाव खेळून INDI आघाडीत राहुल गांधींचे वर्चस्व प्रस्थापित केले.

    Congress to push DMK candidate for vice presidential election

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anna Hazare : पुण्यातील ‘अण्णा आता तरी उठा’ फ्लेक्सवर अण्णा हजारेंची नाराजी; म्हणाले – मीच लढत राहावे ही अपेक्षा चुकीची

    ECI : निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणू शकतात विरोधक; लोकसभेत ‘वोट चोर-गद्दी छोड’च्या घोषणा

    Congress : काँग्रेस नेत्याने RSSला भारतीय तालिबान म्हटले; भाजपचा पलटवार- काँग्रेसला PFI-सिमी संघटना आवडतात