विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या धार्मिक आणि अध्यात्मिक अनुष्ठानाची जोरदार तयारी सुरू असताना राजकारणालाही मोठा रंग चढला आहे. राम जन्मभूमी ट्रस्टने देशातल्या प्रमुख नेत्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही निमंत्रण मिळाले आहे. सोनिया गांधी या सोहळ्यास उपस्थित राहण्यावरून राहण्यास अनुकूल असल्याची बातमी NDTV ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. Congress talks with Muslim League about attending Ram Mandir function
पण त्या पुढची बातमी जास्त धक्कादायक आहे, ती म्हणजे सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सोनिया गांधींनी अनुकूलता दर्शवण्यापूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केरळ मधल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाशी चर्चा केली आहे.
राम जन्मभूमी ट्रस्टकडून राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मिळून देखील जर काँग्रेसचे प्रतिनिधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत, तर काँग्रेसची आणि “इंडिया” आघाडीची प्रतिमा हिंदू विरोधी रंगविण्याची संधी भाजप आणि संघ परिवाराला मिळेल. काँग्रेस विरुद्ध प्रचार करण्यासाठी भाजपला हातात आयते कोलीत मिळेल. पण अशी संधी त्यांना मिळू नये, यासाठी स्वतः सोनिया गांधी किंवा सोनिया गांधी यांच्या वतीने प्रातिनिधिक शिष्टमंडळ राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याची चर्चा पक्षात घाटत आहे.
या संदर्भातच काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मुस्लिम लीगच्या नेत्यांशी बातचीत करून त्यांना काँग्रेस नेत्यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणे किती आवश्यक आहे, हे पटवून दिल्याचे NDTV च्या बातमीत नमूद केले आहे.
पण मूळात राम मंदिराच्या विषयावर काँग्रेस अंतर्गत चर्चा करण्याबरोबरच मुस्लिम लीगशी चर्चा करण्याची वेळ काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेतृत्वाला आली, यातच काँग्रेसच्या पक्षांतर्गत धोरण लकव्याचे उदाहरण समोर आले.
हे तर मुस्लिम तुष्टीकरण
काँग्रेसचे मूलभूत राजकीय धोरण धर्मनिरपेक्षतेचे असले, तरी पक्षाचे सर्व प्रमुख नेते हिंदू समाजाचेच आहेत, तरी देखील राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहायचे किंवा नाही, याची चर्चा काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेतृत्वाला मुस्लिम लीग सारख्या पक्षाशी करावीशी वाटली, यामुळे पक्षाच्या मूलभूत धर्मनिरपेक्षतेचे रूपांतर मुस्लिम तुष्टीकरणात झाल्याचे दिसते. पक्षाचे नेते बहुसंख्येने हिंदू असताना काँग्रेस नेतृत्व स्वतंत्र निर्णय घेण्यात सक्षम नसल्याचा संदेश यातून जनतेसमोर गेला आहे. काँग्रेस आणि “इंडिया” आघाडीसाठी हे राजकीयदृष्ट्या अत्यंत घातक ठरण्याची शक्यता आहे.
Congress talks with Muslim League about attending Ram Mandir function
महत्वाच्या बातम्या
- अयोध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातील ‘या’ VVIP व्यक्तींना निमंत्रण!
- ऋषभ पंतसह अनेक हॉटेल मालकांची फसवणूक करणाऱ्या क्रिकेटपटूला अटक
- अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर तयार, पंतप्रधान मोदी उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार
- पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार