• Download App
    Congress spokesperson Jairam Ramesh has mutually exclude the JD(U) from the INDI alliance.

    काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी JD(U) ला INDI आघाडीतून परस्पर “वगळले”!!

    वृत्तसंस्था

    बागडोगरा : बिहारमध्ये प्रचंड राजकीय उलथापालथ घडत असताना तिथे काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. आपले आमदार वाचवण्यासाठी काँग्रेस हायकमांडकडून कुठल्याही हालचाली सुरू असल्याच्या बातम्या नाहीत. Congress spokesperson Jairam Ramesh has mutually exclude the JD(U) from the INDI alliance.

    नितीश कुमार यांचा निर्णय अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही, पण काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी INDI आघाडीतून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला अर्थात JD(U) ला परस्पर “वगळून” टाकले.

    पश्चिम बंगाल मधल्या बागडोग्रा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी INDI आघाडी मजबूत आहे. सगळे पक्ष एकत्र आहेत. डीएमके, एनसीपी, टीएमसी, समाजवादी पार्टी हे सगळे पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देतील, असे वक्तव्य केले. मात्र, यातून त्यांनी नीतीश कुमार यांच्या JD(U) ला चतुराईने वगळून टाकले.

    त्या उलट जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्यावरच शरसंधान साधले. स्वतः नितीश कुमार यांनीच 18 जुलै 2023 ला पाटण्यात विरोधकांची बैठक बोलावली. त्यानंतर बंगलोर मध्ये बैठक बोलावली. मुंबईत देखील बैठक झाली. या प्रत्येक बैठकीत नितीश कुमार यांचाच पुढाकार होता. पण आता बिहारच्या राजकारणात नेमके काय होते, त्यातल्या अफवांवर मी कमेंट करणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले.

    पण INDI आघाडी मजबूत आहे, असे सांगताना त्यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी या पक्षांची नावे घेतली. पण त्यातून त्यांनी संयुक्त जनता दल अर्थात JD(U) ला वगळले.

    Congress spokesperson Jairam Ramesh has mutually exclude the JD(U) from the INDI alliance.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार

    Shubhanshu Shukla : निरोप समारंभात शुभांशू अंतराळातून म्हणाले- भारत आज भी सारे जहाँ से अच्छा! आज पृथ्वीवर परतणार