वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचे निधन झाल्यानंतर सर्व विरोधी पक्ष आता भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींच्या पाठीशी उभे राहिले असून त्यांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. Congress’ Sonia Gandhi, NCP’s Sharad Pawar, TMC’s Mamata Banerjee & others write to President Ram Nath Kovind urging him
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूळ काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले असून भीमा कोरेगावच्या दंगलीसाठी अटक केलेल्यांवरील UAPA कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या खोट्या केसेस मागे घेण्याची मागणी केली आहे.
स्टॅन स्वामी ८४ वर्षांचे होते. मधूमेहापासून त्यांना अनेक आजार होते. पण स्टॅन स्वामी यांना तळोजा जेलमध्ये वैद्यकीय मदत आणि उपचार नाकारले गेले. जेव्हा त्या विरोधात आवाज उठविला तेव्हाच त्यांना काही प्रमाणात वैद्यकीय मदत आणि उपचार दिले गेले. कोविड काळात त्यांना तळोजा जेलच्या गर्दीतून दुसरीकडे हालवायला हवे होते. त्यांचे जामीनअर्ज वारंवार फेटाळले गेले. मुंबई हायकोर्टाने सांगितल्यावर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. पण तो पर्यंत उशीर झाला होता आणि त्यांचा मृत्यू झाला, असे आरोप या नेत्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात केले आहेत.
स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूसाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात ज्या आरोपींवर UAPA कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या खोट्या केसेस मागे घेण्याची आणि त्यांना तुरूंगातून सोडून देण्याची मागणी आम्ही करीत आहोत, असे सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, एच. डी. देवेगौडा, फारूक अब्दुल्ला, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव, डी. राजा आणि सीताराम येचुरी यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.