आसाम भाजप युनिटने गुवाहाटी येथील राज्य मुख्यालयात पक्ष प्रवेशासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे Congress Shocked Ankita Dutta Bismita Gogoin along with other Congress leaders will enter BJP
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटा : आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या माजी प्रमुख डॉ.अंकिता दत्ता रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी आपला छळ केल्याचा आरोप अंकिता दत्ता यांनी केला आहे. 22 एप्रिल रोजी अंकिता दत्ताच्या तक्रारीवरून श्रीनिवास बीवी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यांच्या तक्रारीत, अंकिता यांनी श्रीनिवास यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून “छळ” आणि “भेदभाव” केल्याचा आरोप केला आहे. पक्षविरोधी कारवायांसाठी अंकिता यांना नंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता दत्ता आणि बिस्मिता गोगोई यांच्या व्यतिरिक्त, ऑल आसाम स्टुडंट युनियनच्या (AASU) माजी नेत्यांसह अनेकजण रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आसाम भाजप युनिटने गुवाहाटी येथील राज्य मुख्यालयात पक्ष प्रवेशासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. अंकिता दत्ताने एएनआयला फोनवरून सांगितले की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, गोलाघाटमधील खुमताई मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदाराने शनिवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना राजीनामा पत्र पाठवले.
Congress Shocked Ankita Dutta Bismita Gogoin along with other Congress leaders will enter BJP
महत्वाच्या बातम्या
- Land for Job Scam : जमीन घोटाळ्याप्रकरणी ‘ED’चे राबडी देवींना समन्स
- कोट्यवधींचे नुकसान झाल्यानंतर मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना सूचलं शहाणपण आणि..
- मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या विमानामध्ये गोंधळ, प्रवासी म्हणाला माझ्या सीटखाली बॉम्ब, मग…
- कर्नाटकातील कलबुर्गीत आंबेडकरांचा फोटो हाती घ्यायला लावून विद्यार्थ्याची काढली नग्न परेड