मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ही मागणी अनेकदा मांडली आहे, असंही खर्गेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एक विशेष मागणी केली आहे. देशात २०२१ची दशवार्षिक जनगणना लवकरात लवकर करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि जाती हा जनगणनेचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. Congress president Mallikarjun Kharge sent a letter to Prime Minister Modi and made demand
काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या पत्रात पंतप्रधानांना जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. यामुळे सामाजिक न्याय आणि सबलीकरण बळकट होईल, असे ते म्हणाले आहेत. याशिवाय काँग्रेस अध्यक्षांनी त्यांच्या पत्रात पंतप्रधानांना सांगितले की, काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्यावतीने मी पुन्हा एकदा जातनिहाय जनगणनेची मागणी करण्यासाठी पत्र लिहित आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात ही मागणी अनेकदा मांडली आहे. याशिवाय इतर अनेक विरोधी नेत्यांनीही ही मागणी केल्याचे खर्गे यांनी सांगितले आहे.
जयराम रमेश यांनी ट्विट केले पत्र-
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र ट्विटमध्ये शेअर केले. लोकसंख्येनुसार आता सर्वांना समान हक्क मिळायला हवेत, असे ते म्हणाले. काँग्रेसने यापूर्वी अनेकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.
बिहारमध्ये जातीवर आधारित जनगणना –
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यापूर्वीच जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे. हे दोन टप्प्यात करण्याचे जाहीर करण्यात आले असून, पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. जनगणनेचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला आहे. त्यासाठी जातसंहिताही जारी करण्यात आली आहे. प्रत्येक जातीला वेगळी संहिता दिली आहे.
Congress president Mallikarjun Kharge sent a letter to Prime Minister Modi and made demand
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या; पण अतीकच्या बातम्यांपुढे नॅशनल मीडियात झाकोळल्या!!
- ‘’उत्तराखंडमध्ये ‘लँड जिहाद’ आणि ‘मझार जिहाद’ खपवून घेणार नाही’’ – पुष्करसिंह धामींचा इशारा!
- सावरकरांचा अपमान : मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना दम, पण नागपूरच्या सभेत वडेट्टीवार कन्येपुढे नांगी!!
- न्यू इंडियन एक्सप्रेस कृत राष्ट्रवादीतल्या अस्वस्थतेचे पोस्टमार्टेम : अजितदादा हे अमित शहांना भेटले? प्रफुल्ल पटेलही अजितदादांच्या बाजूने?