विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली विकास कामांची भूमिपूजने आणि उद्घाटने तसेच अरविंद केजरीवालांनी दिलेली आश्वासने यांना काँग्रेस आणि असदुद्दीन ओवैसी यांनी एकाच मापात तोलून समान भाषेत उत्तर दिले आहे. वास्तविक काँग्रेस आणि असदुद्दीन ओवेसी स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहेत, पण त्यांची भाजप आणि आम आदमी पार्टीविरुद्धची भाषा मात्र समान झाली आहे. Congress + owaisi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनच दिवसांपूर्वी साडेचार हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. आज त्यांनी 12000 कोटी रुपये यांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. यामध्ये मेट्रो चारच्या उद्घाटनाचा देखील समावेश होता. Congress + owaisi
मात्र याच मुद्द्यावरून दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत असलेले संदीप दीक्षित यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या तोंडावरची भूमिपूजन आणि उद्घाटन करत आहेत किंवा अरविंद केजरीवाल जी आश्वासने देत आहेत, ती गेल्या दहा वर्षात त्यांनी का दिली नाहीत किंवा केली नाहीत??, हे सवाल दिल्लीची जनता करत आहे. भाजप आणि केजरीवालांची आदमी पार्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना फक्त काँग्रेसला हरवायचे आहे. दिल्लीच्या जनतेशी त्यांचे काही देणे घेणे नाही, असे शरसंधान संदीप दीक्षित यांनी साधले.
असदुद्दीन ओवैसी यांनी समान भाषेत भाजप आणि आम आदमी पार्टीला ठोकून काढले. भाजप आणि आम आदमी पार्टी वरवर वेगळे दिसत असली, तरी प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीच त्यांची जननी आहे. केजरीवाल हिंदुत्वाचा छुपा अजेंडा चालवत आहेत. ते दिल्लीतला सगळा कचरा गोळा करून फक्त मुस्लिम वस्त्यांमध्ये फेकत आहेत. मोदी सरकारने देखील प्रधानमंत्री आवास योजनेतून मुस्लिमांना घरे दिली नाहीत, अशा आरोपांच्या फैरी असदुद्दीन ओवैसी यांनी झाडल्या.
Congress + owaisi targets BJP and AAP in same language
महत्वाच्या बातम्या
- Nitin Gadkari : नितीन गडकरी पुन्हा स्पष्टच बोलले ; म्हणाले- राजकारणात वापरा आणि फेकण्याचे तत्वज्ञान
- देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सामनात कौतुक होणे महाराष्ट्राचे संस्कार, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत
- Ajitdada : धनंजय मुंडेंविरुद्ध सगळे एकवटले तरी अजितदादा अजून नामानिराळे!!
- America : गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली! वॉशिंग्टन डीसीमध्ये हल्ला, 5 जखमी