• Download App
    राजीव गांधी हत्या : 6 आरोपींच्या सुटकेला काँग्रेसचा विरोध; सुप्रीम कोर्टाच्या सुटकेच्या निर्णयानंतर नलिनीच्या घरासमोर फटाके आणि मिठाईवाटप Congress opposes release of accused; Firecrackers and distribution of sweets in front of Nalini's house after Supreme Court's acquittal

    राजीव गांधी हत्या : 6 आरोपींच्या सुटकेला काँग्रेसचा विरोध; सुप्रीम कोर्टाच्या सुटकेच्या निर्णयानंतर नलिनीच्या घरासमोर फटाके आणि मिठाईवाटप

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील 6 आरोपींची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज आपल्या विशेष अधिकारात दिले आहेत. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून कोर्टाच्या निर्णयाला विरोध केला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अजिबात स्वीकारार्ह नाही आणि भारतीयांच्या मनात असलेला तर अजिबात नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे ट्विट केले आहे. Congress opposes release of accused; Firecrackers and distribution of sweets in front of Nalini’s house after Supreme Court’s acquittal

    एकीकडे काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध केला असताना दुसरीकडे या प्रकरणात आधी पॅरोलवर घरी असलेली आरोपी नलिनी श्रीहरन हिची देखील सुप्रीम कोर्टाने विशेष अधिकाऱ्याद्वारे सुटका केली आहे. सुटकेचे आदेश आल्यानंतर नलिनी श्रीहरन हिच्या तामिळनाडूमधील वेल्लोरच्या घरासमोर तिच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. फटाके वाजवून मिठाई वाटली आहे.

     

    राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची किमान 30 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगून झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने घटना कलम 142 अन्वये कोर्टाला मिळालेल्या विशेष अधिकारात 6 आरोपींची सुटका केली. या निर्णयाला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नलिनीच्या घरासमोर जल्लोष होणे आणि फटाके फोडून मिठाई वाटणे ही बाब वेगळी ठरली आहे.

    Congress opposes release of accused; Firecrackers and distribution of sweets in front of Nalini’s house after Supreme Court’s acquittal

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त