वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळ काँग्रेसचे खासदार राजमोहन उन्नीथन यांनी इस्रायल-हमास युद्धाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना कोणत्याही खटल्याशिवाय गोळ्या घातल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.Congress MP said – Netanyahu should be shot; Prime Minister of Israel is a war criminal, should be punished without trial
शुक्रवारी, 17 नोव्हेंबर रोजी केरळमधील कासारगोड येथे पॅलेस्टाईनशी एकता दर्शविण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजमोहन हे कासारगोडचे खासदार आहेत. येथे त्यांनी नरसंहारासाठी नाझींच्या खटल्याचा संदर्भ देत न्युरेमबर्ग मॉडेलचे उघडपणे समर्थन केले.
नेतन्याहू यांची न्युरेमबर्ग मॉडेलअंतर्गत हत्या व्हावी
राजमोहन म्हणाले की, जिनिव्हा करारांतर्गत सर्व करार मोडणाऱ्यांचे काय केले पाहिजे. दुसर्या महायुद्धानंतर, युद्ध गुन्ह्यातील दोषींना (नाझी) न्याय मिळवून देण्यासाठी न्युरेमबर्ग ट्रायल्स नावाचे काहीतरी होते. न्युरेमबर्ग मॉडेलमध्ये युद्धातील आरोपींना कोणत्याही केसशिवाय गोळ्या घालून ठार करण्यात आले.
ते म्हणाले की, आता वेळ आली आहे की इस्रायली पंतप्रधानांच्या विरोधात न्यूरेमबर्ग मॉडेल लागू केले पाहिजे. आज बेंजामिन नेतान्याहू हे युद्ध गुन्हेगार म्हणून जगासमोर उभे आहेत.
केंद्र सरकारकडे युद्धबंदीची मागणी
राजमोहन उन्नीथन यांच्या आधी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गाझामधील इस्रायलच्या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करतो, असे विधान केले होते. केंद्र सरकारने या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून युद्धबंदीसाठी प्रयत्न करावेत.
Congress MP said – Netanyahu should be shot; Prime Minister of Israel is a war criminal, should be punished without trial
महत्वाच्या बातम्या
- ‘IDF’ने घेतला बदला! जर्मन-इस्रायली तरुणीला जीपमधून नग्न फिरवणाऱ्या हमासच्या दहशतवाद्याला केले ठार
- ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा महामुकाबला!
- योगींच्या उत्तर प्रदेशात हलाल उत्पादन साठवणूक आणि विक्रीवर संपूर्ण बंदी!!
- इस्रायलने पुन्हा हमासच्या गैरकृत्यांचे पुरावे दिले, गाझा शाळेत ठेवलेल्या रॉकेट लॉन्चरचा व्हिडिओ जारी