विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणात विधानसभा निवडणुकीत उद्या मतदान होत असताना काँग्रेस अप बीट मूडमध्ये आहे, पण पक्षातल्या वरिष्ठ दलित नेत्या कुमारी शैलजा यांनी बरोबर टायमिंग साधत मतदानाच्या आदल्या दिवशी आज नाराजी दाखवली. इतकेच नाहीतर काँग्रेस हायकमांड आपल्याकडे “दुर्लक्ष” करू शकत नाही, अशा सूचक शब्दांमध्ये त्यांनी इशारा देखील दिला. Congress MP Kumari Selja says
संपूर्ण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसची सूत्रे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी आपल्या ताब्यात ठेवल्याने कुमारी शैलजा नाराजच आहेत. त्यांनी आपली नाराजी आज बरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. भूपेंद्र सिंग हुड्डा 10 वर्षे मुख्यमंत्री राहिल्याने त्यांना स्वतः खेरीज दुसरे कुठले नेते दिसतच नाही. मीडिया देखील त्यांच्याच मागे धावतो, पण याचा अर्थ काँग्रेसमध्ये बाकीचे नेते सक्षम नाहीत, असा होत नाही. काँग्रेस हायकमांड देखील बाकीच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करू शकेल, असे वाटत नाही, अशा सूचक शब्दांत कुमारी शैलजा यांनी इशारा दिला.
कुमारी शैलजा हरियाणातल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेते आहेत. त्या दलित समुदायातून येतात. दलित समुदायाचा हरियाणातल्या 90 पैकी 17 मतदारसंघांमध्ये निर्णायक प्रभाव आहे, तर 35 मतदारसंघांमध्ये दलित मतदारांचा विशिष्ट मर्यादेत प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड चुरशीची लढत असताना एकेका जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात कुमारी शैलजा यांच्यासारख्या नेत्या भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा खेळ 5 – 10 जागांनी सहज बिघडवू शकतात. त्यांनी आतापर्यंत उघड बंडखोरी केली नसल्यानेच त्यांचा काँग्रेस पक्षाला आणि भुपेंद्र सिंग हुड्डा यांना जास्त “धोका” वाटतो आहे.
Congress MP Kumari Selja says
महत्वाच्या बातम्या
- ‘…त्यातील एका मागणीची आज पूर्तता झाली’ ; राज ठाकरेंची विशेष प्रतिक्रिया
- Marathi : मोदी सरकारने मराठीला दिला अभिजात भाषेचा दर्जा; पण तो काँग्रेसला मात्र टोचला!!
- Karnataka : कर्नाटकचे आरोग्यमंत्री अडचणीत, सावरकरांचे नातू करणार मानहानीचा दावा
- Siddaramaiahs : सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या; आता MUDA प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप!