विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत 99 जागा मिळाल्याच्या आनंदाच्या भरात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी धडाधड दौरे सुरू केले, पण या सगळ्यांमध्ये राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय तसाच लटकवत ठेवला. congress MP from Wayanad, Rahul Gandhi holds a roadshow in Edavanna, Malappuram district.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी काल रायबरेली मध्ये जाऊन मतदारांचे आभार मानले. तिथल्या भाषणात राहुल गांधींनी अगदी राणा भीमदेवी थाटात प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणुकीला उभ्या राहिल्या असत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठ्या फरकाने पराभव झाला असत्या, असा दावा केला. प्रत्यक्षात राहुल गांधींनी किंवा काँग्रेसने प्रियांका गांधींना कुठल्याच निवडणुकीत तिकीट दिले नाही हा भाग अलहिदा. इतकेच काय पण रॉबर्ट वाड्रा यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असताना त्यांचेही तिकीट गांधी परिवाराने कापले, पण काँग्रेसला मोठी यश मिळाल्यानंतर मात्र राहुल गांधींनी प्रियांका गांधी वाराणसीतून निवडून आले असत्या, असे मानभावी भाषण केले.
त्या पाठोपाठ राहुल गांधींनी आज वायनाड लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. त्यांनी मल्लपूरम येथे मोठा रोड शो केला. वायनाडच्या मतदारांचे त्यांनी आभार मानले, पण या सगळ्यांमध्ये राहुल गांधी यांनी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय मात्र तसाच लटकवत ठेवला. राहुल गांधींनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते व्हावे, असा ठराव काँग्रेसच्या कार्यकारिणीने मंजूर केला. सगळ्या काँग्रेस नेत्यांनी तसा जोरदार आग्रह धरला. परंतु, ते जबाबदारीचे पद मात्र स्वीकारायला अद्याप तरी राहुल गांधींनी नकार दिल्याचे दिसते. त्यामुळे राहुल गांधी लोकसभेत कायदेशीर चौकटीत राहून नरेंद्र मोदींना सामोरे जायला बिचकत असल्याची प्रतिमा तयार व्हायला लागली आहे
congress MP from Wayanad, Rahul Gandhi holds a roadshow in Edavanna, Malappuram district.
महत्वाच्या बातम्या
- जयपूरच्या ज्वेलरने केली अमेरिकन महिलेची फसवणूक, 300 रुपयांचा बनावट दागिने तब्बल 6 कोटींना विकला
- UGCची मोठी घोषणा : आता विद्यापीठांमध्ये वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार; जुलैनंतर जानेवारीतही प्रवेश प्रक्रिया
- केंद्र सरकारची मोठी घोषणा : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी होणार नवीन लष्करप्रमुख; 30 जूनला पदभार स्वीकारणार
- बजरंग सोनवणे आले पवारांच्या पक्षातून निवडून, आता फोन मात्र अजितदादांना!!; मिटकरींच्या पोस्टमुळे खळबळ!!