• Download App
    केंद्रीय अर्थसंकल्पात दक्षिण भारतावर अन्याय झाल्याचा कांगावा; काँग्रेस खासदाराच्या तोंडी स्वतंत्र देशाची फुटीरतावादी मागणी!!|Congress MP d. k. Suresh makes separatist statement, demanded separate nation of south India

    केंद्रीय अर्थसंकल्पात दक्षिण भारतावर अन्याय झाल्याचा कांगावा; काँग्रेस खासदाराच्या तोंडी स्वतंत्र देशाची फुटीरतावादी मागणी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातला सर्वांत मोठा विरोधी पक्ष काँग्रेसचे राजकीय फ्रस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यातून त्या पक्षाच्या खासदाराच्या तोंडी दक्षिण भारतासाठी स्वतंत्र देशाची मागणी करण्याची फुटीरतावादी भाषा आली आहे.Congress MP d. k. Suresh makes separatist statement, demanded separate nation of south India

    केंद्रातील मोदी सरकारने आज लोकसभेत सादर केलेल्या विकसित भारताच्या पायाभरणीच्या अर्थसंकल्पात दक्षिण भारतावर सरकारने अन्याय केलाचा कांगावा करत काँग्रेसचे कर्नाटक मधले खासदार डी. के. सुरेश यांच्या तोंडी स्वतंत्र देशाची फुटीरतावादी भाषा आली. दक्षिण भारतातून केंद्र सरकारला तब्बल 4 लाख कोटींचा महसूल जातो, पण केंद्र सरकार दक्षिण भारताला काहीही देत नाही, असा कांगावा करून डी. के. सुरेश यांनी अन्यथा आम्हाला स्वतंत्र देशाची मागणी करावी लागेल, अशी भाषा वापरली.



    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी डी. के. सुरेश यांच्या या फुटीरतावादी भाषेवर सारवासारव करत ही काँग्रेसची मागणी नाही. बाकी डी. के. सुरेश यांच्या स्टेटमेंट बद्दल तुम्ही त्यांनाच काय ते विचारा, असे सांगून हात झटकले.

    पण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मात्र डी. के. सुरेश यांच्या वक्तव्याचे वेगळ्या पद्धतीने समर्थन केले. दक्षिण भारतातून केंद्र सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणात महसूल जातो हे खरे आहे. केंद्र सरकार कायमच दक्षिण भारतावर अन्याय करते हे देखील खरे आहे, पण आम्ही स्वतंत्र देश मागण्याच्या भूमिकेचा सध्या विचार करू शकत नाही, असे वक्तव्य डी. के. शिवकुमार यांनी केले. केंद्र सरकार दक्षिण भारतावर अन्याय करते हा कांगावा डी. के. सुरेश यांनी केला. त्या कांगाव्याचे मात्र डी. के. शिवकुमार यांनी समर्थनच केले.

    काँग्रेसचे फ्रस्ट्रेशन

    काँग्रेसला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पराभवाचे एकापाठोपाठ एक दणके बसले. पक्षाची संघटना राष्ट्रीय पातळीवर उभीच राहू शकत नाही, अशी अवस्था आली. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दक्षिण – उत्तर भारतामध्ये 3500 किलोमीटर फिरली, पण त्याचा राजकीय लाभ काय झाला नाही. आता देखील राहुल गांधींच्या पूर्व – पश्चिम भारत जोडो यात्रेत फारसा प्रतिसाद मिळत नाही. उलट भारत जोडो यात्रा जसजशी पुढे सरकते आहे, तस तसा इंडिया आघाडीला फटका बसून एक एक घटक पक्ष बाहेर पडतो आहे. त्यामुळे काँग्रेसचे राजकीय फ्रस्ट्रेशन प्रचंड वाढले आहे आणि या फ्रस्ट्रेशन मधूनच खासदार डी. के. सुरेश यांच्या तोंडी दक्षिण भारताला स्वतंत्र देश करण्याची मागणी करण्याची फुटीरतावादी भाषा आली आहे.

    Congress MP d. k. Suresh makes separatist statement, demanded separate nation of south India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो