• Download App
    काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, एमपी पोलिसांनी ठेवले 5000 रुपयाचे इनाम । Congress MLA Morwal son accused of rape, MP police put a reward of Rs 5,000

    काँग्रेस आमदाराच्या मुलावर बलात्काराचा आरोप, माहिती देणाऱ्यास एमपी पोलिसांकडून 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर

    Congress MLA Morwal : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याजवळील बडनगर येथील कॉंग्रेसच्या आमदाराच्या मुलावर पोलिसांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी आमदार पुत्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने 12 जुलै रोजी अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. बलात्काराचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस नेत्या म्हणाल्या की, एफआयआर नोंदल्यानंतरही पोलीस अद्यापपर्यंत आरोपीला पकडू शकलेले नाहीत. Congress MLA Morwal son accused of rape, MP police put a reward of Rs 5,000


    विशेष प्रतिनिधी

    उज्जैन : मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्याजवळील बडनगर येथील कॉंग्रेसच्या आमदाराच्या मुलावर पोलिसांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गेल्या 3 महिन्यांपूर्वी आमदार पुत्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कोर्टाने 12 जुलै रोजी अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. बलात्काराचा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस नेत्या म्हणाल्या की, एफआयआर नोंदल्यानंतरही पोलीस अद्यापपर्यंत आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

    3 महिन्यांपूर्वी पीडित महिलेने उज्जैनजवळील बडनगरमधील कॉंग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पीडित महिला युवा कॉंग्रेसची पदाधिकारी आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, काही महिन्यांपूर्वी आरोपी करण तिला भंवरकुआन परिसरातील हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकीही दिली.

    अंमली पदार्थ खाऊ घालून बलात्कार

    या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पीडित महिला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॅट रोडवर करणच्या संपर्कात आली होती. या वेळी दोघांमध्ये एक मैत्री वाढली. हळूहळू पीडितेने फोन व मेसेजद्वारे बोलण्यास सुरूवात केली. पीडितेच्या आरोपानुसार, अनेक वेळा आरोपी तिला भेटण्यासाठी इंदूरलाही गेला होता. आरोपीने तिच्यावर इंदूरजवळील हॉटेलमध्ये लग्न करण्याचे आमिष दाखवून अंमली पदार्थ खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला होता.

    कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

    12 जुलै रोजी कोर्टाने आरोपी करण मोरवालचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. आरोपी करण मोरवालने अटकपूर्व जामिनाचे काही पुरावे सादर केले होते, त्या घटनेच्या वेळी आरोपीने काही कारणास्तव स्वत: रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले होते. या पुराव्यांच्या आधारे आरोपी कोर्टाकडे जामीन मागत होता, परंतु पीडितेने कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्सअ‍ॅप संदेशासारखे काही पुरावे सादर केले. यावर आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा कोर्टाने फेटाळला. पीडितेने पोलिसांवर आरोप केला आहे की, एफआयआर नोंदविल्याच्या 100 दिवसानंतरही पोलिसांना अद्याप आरोपीला अटक करण्यात यश आलेले नाही.

    Congress MLA Morwal son accused of rape, MP police put a reward of Rs 5,000

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य