• Download App
    हरियाणातील नूह हिंसाचाराचा मास्टर माईंड काँग्रेस आमदार मामन खानला अटक|Congress MLA Maman Khan, mastermind of Noah violence in Haryana arrested

    हरियाणातील नूह हिंसाचाराचा मास्टर माईंड काँग्रेस आमदार मामन खानला अटक

    वृत्तसंस्था

    चंदीगड :  हरियाणातील नूह हिंसाचाराचा मास्टर माईंड काँग्रेस आमदार मामन खान याला हरियाणा पोलिसांनी अटक केली. जुलैच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धार्मिक मिरवणुकीच्या निमित्ताने दगडफेक जाळपोळ आणि हिंसाचार याची सगळी चिथावणी मामान खानने दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.Congress MLA Maman Khan, mastermind of Noah violence in Haryana arrested

    अटकेपूर्वी मामन खान याने हायकोर्टात जाऊन दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी मामन खानला फिरोजपूर झिरीका मधून अटक केली. पोलिसांनी यापूर्वी दोन वेळा त्याला चौकशीसाठी रीतसर नोटीस बजावली होती. मात्र त्याने चौकशीत सहभाग घेतला नाही. नूह हिंसाचार भडकावल्याचा आरोप मामनवर आहे. भाजपाने सुरुवातीपासूनच मामन खानला या संपूर्ण घटनेचा मास्टर माईंड म्हटले आहे.



    मामनला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. हरियाणा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारात काँग्रेस आमदाराच्या सहभागाचे पुरेसे पुरावे आहेत. अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी मामन खानने मंगळवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर 19 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच हरियाणा पोलिसांनी मामन खानला अटक केली आहे.

    मामन खानविरुद्ध पुरेसे पुरावे आढळल्यानंतरच या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती हरियाणा पोलिसांनी हायकोर्टाला दिली आहे. पोलिसांकडे मामन खानचे फोन कॉल रेकॉर्ड आणि इतर पुरावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे चौकशीसाठी टाळाटाळ करणाऱ्या मामन खानने तपासाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीमध्ये पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असावेत, अशी मागणी केली होती. नूह हिंसाचाराच्या घटनांशी संबंधित प्रकरणे एसआयटीकडे वर्ग करण्यात यावीत, असेही मामन खानने म्हटलं होतं.

    आरोप काय?

    राज्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, जिथे हिंसाचार झाला, तिथे मामन खान आधी गेले होते. मात्र मामनने असे सर्व आरोप फेटाळून सतत स्वत:ला निर्दोष जाहीर केले होते. नूह पोलिसांनी तपास पथकासमोर हजर राहण्यासाठी मामन खानला दोनदा समन्स पाठवले होते. मात्र, दोन्ही वेळा तो तापाचे कारण सांगून पोलिसांसमोर हजर झाला नाही.

    नूह हिंसाचार

    31 जुलै रोजी हरियाणाच्या नूह येथील विश्व हिंदू परिषदेच्या बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर जमावाने दगड आणि काठ्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे नूह, गुरुग्राम, फरीदाबाद, पलवल, रेवाडीसह आसपासच्या भागात जातीय हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी गुरुग्राममधील मशिदीवर झालेल्या हल्ल्यात नायब इमाम मारला गेला होता.

    Congress MLA Maman Khan, mastermind of Noah violence in Haryana arrested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!