• Download App
    ''काँग्रेसने राजस्थानला पाच वर्षात भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये अव्वल बनवले" मोदींचा हल्लाबोल! Congress made Rajasthan top in corruption riots and crimes in five years Modis attack

    ”काँग्रेसने राजस्थानला पाच वर्षात भ्रष्टाचार, दंगली आणि गुन्ह्यांमध्ये अव्वल बनवले” मोदींचा हल्लाबोल!

    अशोक गेलहलोत महिलांचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहेत, असं मोदी म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    भरतपूर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडनंतर आता सर्वांच्या नजरा राजस्थानच्या लढतीकडे लागल्या आहेत. त्यामुळेच राजकीय पक्ष आपली पूर्ण ताकद इथे लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः निवडणुकीची सूत्रे हाती घेण्यासाठी पोहोचले. मोदींनी भरतपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसला फैलावर घेतले. Congress made Rajasthan top in corruption riots and crimes in five years Modis attack

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने गेल्या पाच वर्षात आपल्या कारकिर्दीत भ्रष्टाचारात राज्य प्रथम क्रमांकावर आणले आहे. इतकेच नाही तर काँग्रेसच्या काळात राजस्थान गुन्हेगारी आणि दंगलीतही आघाडीवर आहे.


    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जग’ जिंकले!, भारतासाठी ऐतिहासिक सुवर्ण दिन… -एकनाथ शिंदे


    पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करत म्हटले की, आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत काँग्रेसने राजस्थानला केवळ वाईट गोष्टींमध्ये आघाडीवर केले आहे. जिथे जिथे काँग्रेस सत्तेत आहे तिथे दहशतवाद आणि अत्याचारामुळे सर्व काही नियंत्रणाबाहेर गेले आहे. काँग्रेससाठी तुष्टीकरणच सर्वस्व आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.

    एवढेच नाही तर मोदींनी सीएम अशोक गेहलोत यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यातील महिलांच्या विश्वासाला तडा दिला आहे. ते राजस्थानातील महिलांचे रक्षण करू शकेल का? जे स्वतः म्हणत आहेत की महिलांनी बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. अशा दुष्कर्मवादी पक्षाला शिक्षा झालीच पाहिजे.

    Congress made Rajasthan top in corruption riots and crimes in five years Modis attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक