• Download App
    काँग्रेसला सहा राज्यांत उतरती कळा ; विरोधी पक्षाची जागाही गमावली, प्रादेशिक पक्ष अधिक प्रभावी Congress lost oppostion party stature in 6 sates in last seven years

    काँग्रेसला सहा राज्यांत उतरती कळा ; विरोधी पक्षाची जागाही गमावली, प्रादेशिक पक्ष अधिक प्रभावी

    Congress lost oppostion party stature in 6 sates in last seven years

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या निवडणुकीत काँग्रेसला सपशेल अपयश आले. Congress lost oppostion party stature in 6 sates in last seven years

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अस्तित्त्व त्यामुळे धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षांमधील आकडेवारी पाहिल्यास अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत झाली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये काँग्रेसने जवळपास सहा राज्यांमध्ये विरोधी पक्षाची जागाही गमावली आहे. प्रादेशिक पक्ष काँग्रेसपेक्षा अधिक प्रभावी ठरत आहेत.

    पुदुच्चेरीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. पुदुच्चेरीत तर काँग्रेस पाच वर्षांपासून सत्तेवर होता. तरीही काँग्रेसला 30 पैकी अवघ्या दोन जागांवर विजय मिळवता आला.

    तामिळनाडूत द्रमुक आणि अद्रमुक या पक्षांची आलटून पालटून सत्ता येते. तेथे तब्बल 10 वर्षानंतर सत्तांतर झाले. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांनी स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तेथे काँग्रेसने द्रमुक बरोबर आघाडी केली. परंतु एक राष्ट्रीय पक्ष असून तो स्वबळावर बहुमत प्राप्त करू शकला नाही. एकंदरीत पहिले तर या निवडणुकीत आसाम सोडता प्रादेशिक पक्षांची सरशी झाली.

    Congress lost oppostion party stature in 6 sates in last seven years

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!