विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसच्या वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी यांच्या विजयाविषयी कम्युनिस्ट पार्टीचे नेते जसे बोलले, तसेच राज्याचे मंत्री नितेश राणे बोलले, पण काँग्रेसचे नेते फक्त नितेश राणेंवरच भडकले. कम्युनिस्ट नेत्यांविरुद्ध “ब्र” काढायची त्यांची हिंमत झाली नाही.
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम अतिरेकी संघटनांनी पाठिंबा दिल्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा विजय झाला, असे वक्तव्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य आणि केरळ मधले प्रमुख नेते ए. विजयराघवन यांनी केले होते. कम्युनिस्ट पार्टी केंद्रीय पातळीवर जरी इंडिया आघाडीचा घटक पक्ष असली, तरी केरळमध्ये मात्र काँग्रेस आणि ते एकमेकांच्या विरोधात लढले होते. प्रियांका गांधी यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टीने उमेदवार उभा केला होता.
Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट
वायनाड मध्ये प्रियांका गांधींचा प्रचार कट्टरपंथी मुस्लिम संघटनांनी केला होता. त्याचा लाभ घेऊन प्रियांका गांधी यांचा विजय झाला असे ए विजयराघवन म्हणाले होते. महाराष्ट्रातले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील नेमक्या तशाच आशयाचे वक्तव्य केले. प्रियांका गांधींना मुस्लिम अतिरेकी संघटनांनी पाठिंबा दिला म्हणून केरळमध्ये त्यांचा विजय झाला. केरळमध्ये मिनी पाकिस्तान बनले आहे, असे नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांनी भडकून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अतुल लोंढे आणि बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडिया अकाउंट वर नितेश राणे यांना ठोकणारी पोस्ट लिहिली. भाजपला हिंदू – मुस्लिम करण्याशिवाय दुसरे राजकारण करता येत नाही. सकारात्मक कुठल्या गोष्टी घडवायच्या नाहीत आणि फक्त जातीयवाद भडकवायचा एवढेच त्यांना जमते. मंत्री महोदयांनी तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या, असे टीकास्त्र बाळासाहेब थोरात यांनी सोडले. कम्युनिस्ट नेते ए. विजयराघवन यांच्याविरुद्ध मात्र बाळासाहेब थोरात किंवा बाकी कुठल्याही काँग्रेस नेत्यांनी कुठलेच वक्तव्य केले नाही.