• Download App
    नरसिंह रावांना मोदी सरकारने दिला भारतरत्न किताब; काँग्रेस नेत्यांच्या घशात झाला खवखवाट!!Congress leaders snubs "Bharat Ratna" for Narasimha Rao

    नरसिंह रावांना मोदी सरकारने दिला भारतरत्न किताब; काँग्रेस नेत्यांच्या घशात झाला खवखवाट!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नरसिंह रावांना मोदी सरकारने दिला. भारतरत्न किताब त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या घशात झाला खवखवाट!!, असे चित्र संसदेच्या परिसरात पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना सरकारने किताब जाहीर केल्याचे ट्विट केले. त्या पाठोपाठ चौधरी चरण सिंह आणि डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांनाही भारतरत्न किताब दिल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचा देशातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांना आनंद झाला. Congress leaders snubs “Bharat Ratna” for Narasimha Rao

    पण आपल्या “नावडत्या” नरसिंह राव यांना मोदी सरकारने भारतरत्न किताब दिल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांच्या घशात खवखवाट झाला.

    नरसिंह राव आणि चरण सिंह यांना भारतरत्न किताब जाहीर झाल्याची बातमी कळताच
    संसदेच्या परिसरात असलेल्या पत्रकारांनी तिथे नुकत्याच पोहोचलेल्या सोनिया गांधींना गाठले आणि त्यांना त्याबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावर मी त्याचे स्वागत करते, का करणार नाही??, एवढीच एका ओळीची प्रतिक्रिया व्यक्त करून त्या निघून गेल्या. त्यानंतर पत्रकारांनी काँग्रेसचे लोकसभेतले घटनेचे अधीर रंजन चौधरी यांना गाठले. त्यावर त्यांनी ठीक आहे. त्यांना कोणीतरी भारतरत्न किताब त्यांना दिला दिला ना, झाले तर मग!!, एवढे शब्द बोलून ते संसदेत निघून गेले.

    काँग्रेसचे उत्तर प्रदेश मधले नेते अजय राय यांनी निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने राजकीय हिशेब करून भारतरत्न किताब जाहीर केल्याची टीका केली. लालकृष्ण अडवाणींना त्यांनी आधीच भारतरत्न जाहीर केला आहे. खरं म्हणजे भारतरत्न किताबाची घोषणा एकाच वेळी सर्व नावांची करण्याची प्रथा आहे, पण मोदींनी निवडणुकीचा हिशेब लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने नावे जाहीर केली, असे टीकास्त्र अजय राय यांनी सोडले.

    काँग्रेस नेत्यांना खवखवाट

    नरसिंह राव यांना सोनिया गांधींच्या काँग्रेसने कायमच राजकीय पाण्यात पाहिले. देशाची खाईत गेलेली अर्थव्यवस्था त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने बाहेर काढली. देशाला आर्थिक सुधारणांचा राजकीय वारसा दिला हे नरसिंह रावांचे योगदान कायमच सोनिया गांधींच्या काँग्रेसने नाकारले. त्या उलट सोनियानिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी नरसिंह रावांवर “भाजपचे पहिले पंतप्रधान”, असा ठपका ठेवला. त्या नरसिंह रावांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान मान्य करून त्यांना मोदी सरकारने भारतरत्न किताब जाहीर केला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस नेत्यांच्या घशातला खवखवाट त्यांच्या अशा प्रतिक्रियांमधून बाहेर आला.

    Congress leaders snubs “Bharat Ratna” for Narasimha Rao

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!