• Download App
    Rahul Gandhi पाकिस्तानशी युद्ध राहिले बाजूला, राहुल गांधींना पंतप्रधान करायची काँग्रेस नेत्यांमध्येच लागली स्पर्धा!!

    Rahul Gandhi पाकिस्तानशी युद्ध राहिले बाजूला, राहुल गांधींना पंतप्रधान करायची काँग्रेस नेत्यांमध्येच लागली स्पर्धा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानशी युद्ध करायचे राहिले बाजूला, राहुल गांधींना पंतप्रधान करायची काँग्रेस नेत्यांमध्येच लागली स्पर्धा!!, अशा अवस्थेत नेत्यांनी काँग्रेसला नेऊन ठेवले.

    Operation sindoor भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सशस्त्र संघर्षानंतर राहुल गांधींनी जम्मू काश्मीर मधल्या पूंछला भेट दिली. पाकिस्तानी गोळीबारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली तिथे शंभर ते सव्वाशे घरे क्षतीग्रस्त झाली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यासंदर्भात पत्र लिहिले. पूंछ मधल्या लोकांना मदतीचे पॅकेज जाहीर करण्याची या पत्रातून मागणी केली, पण त्यांनी पाकिस्तानी गोळीबाराचा एका शब्दानेही निषेध केला नाही.

    मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भारत पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात वेगळ्याच मुद्द्याला तोंड फोडत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची वकिली केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना रेवंत रेड्डी म्हणाले, भाषण करणे निराळे आणि युद्ध करून पाकिस्तान व्याप्त काश्मीर खेचून घेणे निराळे. इंदिरा गांधी यांनी फक्त भाषण केले नाही, पण त्यांनी 1971 च्या युद्धात पाकिस्तान तोडले. त्यावेळी देखील त्यांच्यावर सहभागी दबाव होता, पण त्यांनी तो झुगारून लावला.



    आता मोदींकडे फक्त भाषणाची कला आहे. ते पाकिस्तानशी युद्ध करून पाकिस्तान व्यक्त काश्मीर भारतात सामील करून घेऊ शकत नाहीत. त्यासाठी राहुल गांधीच पंतप्रधान व्हायला हवेत. राहुल गांधी पंतप्रधान झाले की ते पाकिस्तानशी युद्ध करून पाकिस्तान प्राप्त काश्मीर भारतात सामील करून घेतील. कारण तेवढे त्यांच्यात हिंमत आहे, असे रेवंत रेड्डी म्हणाले.

    रेवंत रेड्डी यांच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात फार मोठी खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांनी थेट राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा विषय उघड केल्याने भाजपचे नेते त्यांच्यावर तुटून पडले, पण काँग्रेस नेत्यांमध्ये राहुल गांधींच्या विषयी निष्ठा दाखवण्याची स्पर्धा सुरू झाली. रेवंत रेड्डी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी पुढे आले आणि त्यांनी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची पुढची वकिली केली. राहुल गांधींच्या हातात सत्ता आली की ते आक्रमकपणे निर्णय घेतील यात काही शंका नाही. राहुल गांधी ज्या क्षणी पंतप्रधान होतील, त्या क्षणी पाकिस्तानी व्याप्त काश्मीर भारतात सामील होईल, असे वक्तव्य प्रमोद तिवारी यांनी केले.

    Congress leaders pitch for prime ministership for Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mukesh Ambani : मुकेश अंबानी म्हणाले- जिओ AI प्लॅटफॉर्म लाँच करणार; गुजरातमध्ये ₹7 लाख कोटींची गुंतवणूक करणार

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले-राजकोटला मिनी जपान म्हणालो तेव्हा माझी खिल्ली उडवली, आज येथे स्क्रू ड्रायव्हरपासून रॉकेटपर्यंतचे भाग बनतात

    Pakistani Drones : सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये LoC वर 5 ड्रोन दिसले:दावा- पाकिस्तान घुसखोरीच्या प्रयत्नात; सैन्याचा प्रतिहल्ला, शोधमोहीम सुरू