• Download App
    सोनिया - मनमोहन सिंग, खर्गेंना निमंत्रण; पण "काल्पनिक" ठरवलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्यात काँग्रेस नेत्यांची गोची!! Congress leaders in a fix, as they themselves had claimed Ram as imaginary

    सोनिया – मनमोहन सिंग, खर्गेंना निमंत्रण; पण “काल्पनिक” ठरवलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला जाण्यात काँग्रेस नेत्यांची गोची!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आदी नेत्यांना दिले, पण आपणच “काल्पनिक” ठरविलेल्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला उपस्थित राहायचे तरी कसे??, अशी गोची सोनिया गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची झाली आहे. Congress leaders in a fix, as they themselves had claimed Ram as imaginary

    विश्व हिंदू परिषदेने कालच राम जन्मभूमी आंदोलनाचे अध्वर्यू लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण दिले. त्यानंतर आज सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनाही निमंत्रण दिले. यापैकी देवेगौडा यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष जनता दर कर्नाटकात भाजप बरोबर युतीमध्ये आहे. त्यामुळे देवेगौडांना अयोध्येतल्या कार्यक्रमात जाण्यात कुठलीही राजकीय अडचण नाही.

    पण सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, डॉ. मनमोहन सिंग अखेर रंजन चौधरी यांची मात्र पृथ्वी राजकीय गोची झाली आहे. अर्थात ती त्यांनी बिलकुलच मान्य केलेली नाही, पण सोनिया गांधींच्या यूपीए सरकारच्या काळात त्या सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून अयोध्येतली राम जन्मभूमी, राम तसेच रामसेतू या गोष्टी काल्पनिक असल्याचा दावा केला होता. केवळ रामायण सारख्या महाकाव्यांमध्ये रामाचा उल्लेख आहे. तो उल्लेख काल्पनिक आहे. ते ऐतिहासिक सत्य नाही. त्यामुळे राम ही व्यक्तीरेखाच काल्पनिक आहे, असा दावा काँग्रेस प्रणित युपीए आघाडीच्या सरकारने सुप्रीम कोर्टात केला होता.

    परंतु सुप्रीम कोर्टाने काँग्रेसचे हे सर्व दावे फेटाळले. रामजन्मभूमी स्थानावर भव्य राम मंदिर बांधण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे राम मंदिर अस्तित्वात आले आहे आणि त्या राम मंदिरातच रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आता आपणच “काल्पनिक” ठरवलेल्या रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला निमंत्रण असूनही आपण जायचे तरी कसे??, ही खरी सोनिया गांधी, मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे आणि अधिरमन चौधरी यांची गोची आहे!!

    Congress leaders in a fix, as they themselves had claimed Ram as imaginary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड