विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 1 – 40 – 125 हे आकडे पाहा आणि काँग्रेस नेत्यांच्या भविष्यवाण्या वाचा!! काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात ज्या आकड्यांच्या “भविष्यवाण्या” केल्या आहेत, ते आकडे वर दिले आहेत. Congress leaders exaggerated their claims about the numbers in loksabha elections
राहुल गांधी आज उत्तर प्रदेशात होते त्यांनी अखिलेशउत्तर प्रदेशात काँग्रेस अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी बरोबर आघाडी करून फक्त 17 जागा लढवत आहे. मात्र राहुल गांधींनी भाजपची 80 पैकी 1 जागा निवडून येईल, असे “भविष्य” वर्तविले आहे. यादव यांच्यासमवेत प्रयागराज मध्ये मोठी जाहीर सभा घेतली. तिथे काँग्रेस आणि अखिलेश यांच्या समर्थकांनी सभेत प्रचंड गदारोळ केला. पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. राहुल गांधी आणि अखिलेश यादव सभा सोडून निघून गेले. पण नंतर मात्र रायबरेलीच्या एका सभेत बोलताना राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातल्या निवडणुकीचे अत्यंत महत्त्वपूर्ण “भाकीत” केले. भाजपला उत्तर प्रदेशात 80 पैकी फक्त 1 लोकसभेची जागा मिळेल, अशी “भविष्यवाणी” राहुल गांधींनी केली.
देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात मोदी सरकार विरोधात प्रचंड असंतोष असून त्या असंतोषाचे लाटेत रूपांतर झाले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 40 पेक्षा अधिक जागा निवडून येतील, असे भाकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. महाराष्ट्रात काँग्रेस 48 पैकी फक्त 17 जागा लढवत आहे.
त्या पलीकडे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्रात सरकार बनवायचं असेल, तर काँग्रेसला फक्त 125 जागा पुरतील कारण काँग्रेसने 125 जागा जिंकल्या, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी फुटून भाजपचे मित्र पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील, असा दावा केला. यासाठी त्यांनी 2004 च्या निवडणुकीचे उदाहरण दिले 2004 च्या निवडणुकीमध्ये भाजपला 138 आणि काँग्रेसला 145 जागा मिळाल्या होत्या, पण काँग्रेसने आपल्या मित्र पक्षांच्या सहाय्याने केंद्रात स्थिर सरकार बनवले, तसेच 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसने 125 जागा मिळविल्या, तरी देखील इंडी आघाडीचे सरकार बनेल, असा दावा रेवंत रेड्डी यांनी केला.
भाजपने मावळत्या लोकसभेत 303 जागा मिळवल्यानंतर 2024 साठी अब की बार 400 पारची घोषणा दिली. लोकसभेत 417 जागांवर कमळ चिन्हावर उमेदवार उभे केले. काँग्रेसने मात्र 295 जागांवर हाताचा पंजा या चिन्हावर उमेदवार उभे करून काँग्रेसचे मुख्यमंत्री पदावर बसलेले नेते 295 पैकी फक्त 125 जागा निवडून येण्याची अपेक्षा धरत आहेत. मग 4 जून 2024 रोजी सायंकाळी 6.00 नंतर काय चित्र उभे राहिले असेल??
Congress leaders exaggerated their claims about the numbers in loksabha elections
महत्वाच्या बातम्या
- अधीर रंजन चौधरी बंगालमध्ये लढवताहेत काँग्रेसचा उरलेला बालेकिल्ला, पण खर्गेंनी मुंबईतून त्यांनाच दम दिला!!
- कष्टाला नाही कमी, यशाची हमी : 52 दिवस : 115 सभा, माध्यमांना 67 मुलाखती; फडणवीसांचा झंझावात!!
- संघ आणि भाजप कार्यक्षेत्रे वेगळी, पण विचारप्रणाली एकच “राष्ट्र प्रथम”; भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांची स्पष्टोक्ती!!
- अफगाणिस्तानात पुराचा कहर, 70 ठार, अनेकजण बेपत्ता!