विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बिब्बा घालण्याच्या तयारीत असताना लोकसभा निवडणुकीत चांगल्या परफॉर्मन्स दाखवलेली काँग्रेस ठाकरे + पवारांच्या संभाव्य खेळी ओळखून दिल्ली आणि महाराष्ट्रात सावध पण दमदार पावले टाकत आहे. Congress leader Ramesh Chennithala says
लोकसभा निवडणुकीत दाखविलेला अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स राखण्याचा काँग्रेसचा इरादा असून त्यामध्ये संभाव्य कोणते अडथळे असू शकतात??, याचा विचार विनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातले नेते राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी गेले होते. यामध्ये पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील वगैरे नेत्यांचा समावेश होता. मुंबई काँग्रेसमध्ये खासदार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात असंतोष असला तरी, मुंबईतले नेते काँग्रेसच्या विरोधात कुठली कारवाई करण्याची शक्यता नाही.
या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी झालेल्या बैठकीत स्वतः राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल हे देखील सामील झाले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधींनी काँग्रेसच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घातले याला विशेष महत्त्व आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये 3 जून 2024 रोजी तिसऱ्या नंबर वर असलेली काँग्रेस 4 जून 2024 रोजी थेट पहिला नंबर वर आली. ठाकरे + पवारांच्या पक्षांना काँग्रेसने मागे सरून 14 खासदार निवडून आणले. त्यामुळे पक्षाचा हा अडवांटेज काँग्रेसला महाराष्ट्र टिकवून धरायचा आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना बूस्टर डोस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींनी दिला. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली असली तरी काँग्रेसचा यातला पुढाकार त्यांनी बाजूला सारला नाही. उलट काँग्रेस अधिक ऍक्टिव्हली महाविकास आघाडीमध्ये काम करेल असे ते म्हणाले.
याचा अर्थच महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकी मधून निकालातून निर्माण झालेला काँग्रेसचा वरचष्मा टिकवून ठेवण्यासाठी थेट काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत अफेयर्स मध्ये लक्ष घातले. त्यामुळे आघाडीतल्या ठाकरे + पवारांच्या वर्चस्वाला धक्का देण्याची काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे राजधानी मध्ये बोलले जात आहे.
एरवी काँग्रेसचे हायकमांड प्रादेशिक पक्षांशी डील करताना वाटाघाटीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये ऍक्टिव्ह होते, पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी म्हणजेच ठाकरे + पवारांशी प्राथमिक चर्चा सुरू करण्यापूर्वीच काँग्रेस हायकमांड ऍक्टिव्ह झाले, याचा अर्थच महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीतला अडवांटेज अधिकाधिक घट्ट करण्याचा पक्षाचा इरादा उघड झाला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे + पवार नेमकी कोणती भूमिका घेतात आणि काँग्रेस हायकमांडला ते कितपत मागे रेटू शकतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण ठाकरे महाविकास आघाडीत नवीन आहेत, पण पवार काँग्रेस बरोबरच्या राजकारणामध्ये मुरलेले आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशी “डील” करणे निराळे आणि काँग्रेस हायकमांडशी “डील” करणे निराळे, याची पक्की जाणीव आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पार्श्वभूमीवर खूपच आधी ऍक्टिव्ह झालेल्या काँग्रेस हायकमांडशी पवार कसे डील करू शकतात??, याला विशेष महत्त्व आहे.