Saturday, 10 May 2025
  • Download App
    कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी! । congress leader kapil sibal press conference, says its Unfortunate to not have Party president, CWC meeting should be called

    कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला दाखवला आरसा, म्हणाले, पक्षाला अध्यक्ष नसणे हे दुर्भाग्य, सीडब्ल्यूसीची बैठक घ्यावी!

    congress leader kapil sibal press conference, says its Unfortunate to not have Party president, CWC meeting should be called

    kapil sibal press conference : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, दुर्दैवाने काँग्रेसकडे एकही अध्यक्ष नाही. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सीडब्ल्यूसीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. congress leader kapil sibal press conference, says its Unfortunate to not have Party president, CWC meeting should be called


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्षांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, दुर्दैवाने काँग्रेसकडे एकही अध्यक्ष नाही. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सीडब्ल्यूसीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.

    अजूनही पत्राच्या उत्तराची वाट पाहतोय

    सिब्बल म्हणाले, ‘मी तुमच्याशी त्या काँग्रेसजनांच्या वतीने बोलत आहे ज्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीला पक्षाध्यक्षांच्या निवडीसाठी पत्र लिहिले होते आणि आम्ही अजूनही त्याची वाट पाहत आहोत.’

    प्रदेश काँग्रेसचे नियंत्रण दिल्लीतून होऊ नये

    ते म्हणाले, ‘वाट पाहण्याचीसुद्धा मर्यादा आहे. आम्ही किती काळ वाट पाहायची? आम्हाला फक्त एक मजबूत संघटनात्मक रचना हवी आहे. काहीतरी असलं पाहिजे. कोणत्याही समस्येवर CWCमध्ये चर्चा झाली पाहिजे. पंजाबमधील परिस्थितीवर चर्चा झाली पाहिजे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही पक्षासोबत आहोत, पण वस्तुस्थिती अशी आहे की आमच्या पक्षाचा एकही निवडून आलेला अध्यक्ष नाही. ते म्हणाले की, प्रदेश काँग्रेस कमिटीचे नियंत्रण दिल्लीवरून होऊ नये.

    पक्षाची सद्य:स्थिती पाहू शकत नाही

    ते म्हणाले, ‘मी खूप जड अंतःकरणाने इथे आलो आहे. मी अशा पक्षाचा भाग आहे ज्याचा अभिमानी इतिहास आहे. सद्य:स्थिती पाहू शकत नाही. आम्ही आव्हानांना सामोरे जात आहोत आणि पक्ष आज ज्या स्थितीत आहे तिथे असू नये.

    लोक आम्हाला सोडून जात आहेत

    सिब्बल म्हणाले, ‘लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिता निघून गेल्या. फेलेरिओ निघून गेला. सिंधियांनी सोडले. जितिन प्रसाद गेले. सुधीरन केरळहून निघून गेले. आता प्रश्न असा आहे की, लोक का सोडून जात आहेत? एक तार्किक उत्तर असावे.’ ते म्हणाले की, कार्य समितीने संवाद साधला पाहिजे.

    जे केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे, तेच सोडताहेत पक्ष

    ते म्हणाले, ‘आम्ही पक्ष सोडून इतरत्र कुठेही जात नाही. गंमत म्हणजे ज्यांना केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे मानले जात होते ते पक्ष सोडत आहेत. मी त्या नेत्यांना परत येण्याचे आवाहन करतो, कारण काँग्रेस हाच एकमेव पक्ष आहे जो देशाला वाचवू शकतो.

    पंजाबची आम्हाला कल्पना

    ते म्हणाले की, पक्ष कसा बळकट करायचा याचा विचार करायला हवा. पाकिस्तान सीमेपासून 300 किमी दूर पंजाबमध्ये काय चालले आहे? आम्हाला तेथील परिस्थितीची माहिती आहे. आम्हाला तिथला इतिहास माहिती आहे. तिथे दहशतवाद कसा निर्माण झाला हे आम्हाला माहिती आहे. काँग्रेसने एकजूट असल्याची खात्री करावी लागेल.

    जी-23 नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांचा समावेश

    कपिल सिब्बल यांचा 23 नेत्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी गेल्या वर्षी सोनिया गांधींना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष निवडीची मागणी केली होती. सिब्बल म्हणाले, ‘ आम्ही जी हुजूर 23 नाही. आम्ही बरेच काही करत राहू. आमच्या मागण्यांची पुनरावृत्ती करत राहू. ते G-23 होते. मग काही लोक निघून गेले आणि आता लोक त्यात परत येत आहेत.

    भाजपकडून राहुल गांधींवर प्रश्न उपस्थित

    भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंजाबमधील उलथापालथीबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, ‘पंजाबमध्ये काय स्थिती आहे, जे राजकारण चालू आहे ते आम्ही पाहत आहोत. पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. अस्थिरता आणि काँग्रेस समानार्थी आहेत. ही महत्त्वाकांक्षेची लढाई आहे. प्रत्येकाचे मत आहे की स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. राहुल गांधींचे हे एक विलक्षण अपयश आहे. ते म्हणाले की, जी -23 सोबत अमरिंदर सिंग हे राहुल गांधींना कॅप्टन मानत नाहीत.

    congress leader kapil sibal press conference, says its Unfortunate to not have Party president, CWC meeting should be called

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??