• Download App
    |Congress leader joining BJP, and congress started ro convince Sachin Pilot

    कॉँग्रेस नेता भाजपामध्ये येण्याची चर्चा झाली अन् नाराज सचिन पायलटांची मनधरणी सुरू झाली

    कॉँग्रेसचा आणखी एक बडा नेता भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची चर्चा बुधवारी सुरू झाली आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्षाकडून मनधरणी सुरू झाली आहे. नाराज पायलटांची मनधरणी करण्यासाठी पक्षाने त्यांच्या समर्थकांना राजस्थान कॅबिनेटमध्ये 3 मंत्रिपदांसह त्यांना सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी करण्यात येईल, अशी ऑफर दिली आहे.Congress leader joining BJP, and congress started ro convince Sachin Pilot


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कॉँग्रेसचा आणखी एक बडा नेता भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची चर्चा बुधवारी सुरू झाली आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्षाकडून मनधरणी सुरू झाली आहे. नाराज पायलटांची मनधरणी करण्यासाठी पक्षाने त्यांच्या समर्थकांना राजस्थान कॅबिनेटमध्ये 3 मंत्रिपदांसह त्यांना सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी करण्यात येईल, अशी ऑफर दिली आहे.

    राजस्थानात सचिन पायलट विरुद्ध उपमुख्यमंत्रीअशोक गेहलोत यांच्यात संघर्ष सुरू आहे. गेल्या 6 दिवसांपासून पायलट दिल्लीत तळ ठोकून होते. परंतु, त्यांना पक्षश्रेष्ठींनी भेटच दिली नाही. त्यामुळे पायलटांना राजस्थानला परतावे लागले. मात्र, त्यानंतर कॉँग्रेसचा एक बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.



    त्यामुळे कॉंग्रेसमध्ये धास्ती पसरली. लगेचच त्यांची मधरणी सुरू झाली. पायलट समर्थक 3 आमदारांना मंत्रिमंडळात स्थान आणि महानगरपालिका अथवा बोर्डावर योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. मात्र, महानगरपालिका आणि बोर्डांसंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची संख्या निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, 5 से 6 मंत्री पदे मिळावीत, अशी सचिन पायलट यांची इच्छा आहे.

    पक्ष आणि अशोक गेहलोत यांच्यानुसार, 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. यात बीएसपीचे 6 आमदार आणि जवळपास एक डझनहून अधिक अपक्ष आमदारांपैकी काहींना मंत्री करायचे आहे. सचिन यांना सरचिटणीस करून एखाद्या महत्वाच्या राज्याचे प्रभारी करण्यास तयार आहे.

    एवढेच नाही, तर सचिन पायलट सहमत झाल्यास लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही पक्षाने म्हटले आहे. या शिवाय, राजस्थानात सध्या अशोक गेहलोत हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार काम करेल. तसेच सचिन हे पक्षाचे भविष्य आहेत. मात्र, त्यांना गेहलोत यांच्यासोबत समन्वयाने पुढे चालावे लागेल, असेही सांगण्यात आले आहे.

    गेल्या वर्षी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सचिन पायलट यांचे मतभेद झाले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांनी माघार घेतली होती. यावेळी सरकारमध्ये सचिन पायलट यांची भागीदारी वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

    पायलट गटातील आमदारांना मंत्री अथवा राज्यातील कुण्या बोडार्चे सदस्यत्व अथवा चेअरमन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी, पक्षातील कलह संपवण्यासाठी, अशा प्रकारे मार्ग काढण्यात आला असला तरी वाद अद्यापही संपलेला नाही.

    Congress leader joining BJP, and congress started ro convince Sachin Pilot

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!