• Download App
    महागाईच्या जमान्यात कोणता मुसलमान चार – चार बायका करेल??; मुसलमान कधीच भारतात बहुसंख्य होणार नाहीत; दिग्विजय सिंहांचा दावा । congress leader Digvijay Singh claims muslims will not be in majority in india ever

    महागाईच्या जमान्यात कोणता मुसलमान चार – चार बायका करेल??; मुसलमान कधीच भारतात बहुसंख्य होणार नाहीत; दिग्विजय सिंहांचा दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतातील हिंदू – मुसलमान लोकसंख्येवर भाष्य करताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या महागाईच्या जमान्यात कोणता मुसलमान चार – चार बायका करेल… मुसलमान कधीच भारतात बहुसंख्यांक होणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस, डावे पक्ष, कामगार संघटनांनी आयोजित केलेल्या सामाजित सद्भावना परिषदेत ते बोलत होते. congress leader Digvijay Singh claims muslims will not be in majority in india ever

    संघ परिवारावर टीका करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, बहुपत्नीत्वामुळे लोकसंख्या सातत्याने वाढून पुढील १० वर्षात देशातील मुसलमान हे अल्पसंख्याकातून बहुसंख्यांक होतील आणि बहुसंख्यांक अल्पसंख्याक होतील, असा चुकीचा प्रचार केला जातोय. मी मोहन भागवत यांच्यासह संघाच्या प्रचारकांना आव्हान देतो की त्यांनी या विषयावर सार्वजनिक चर्चेसाठी पुढे यावे, या देशात मुसलमा कधीही बहुसंख्यांक होऊ शकत नाहीत हे मी सिद्ध करून दाखवेन.



    भारतातल्या मुसलमानांचा जन्मदर कमी होतो आहे. असा दावा करून ते म्हणाले की या महागाईच्या दिवसात एका सामान्य व्यक्तीला एका बायकोपासून जन्मलेल्या मुलांना वाढवणे कठीण जाते. अशा वेळी कोणता मुसलमान चार बायका आणि त्यांच्या पासून होणाऱ्या मुलांचे पालनपोषण करू शकेल… संघ आणि भाजपच्या बोलण्यात आणि कृतीत फरक आहे, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला.

    -भाजपची रावणाशी तुलना

    रावणाला १० तोंडे होती. तो प्रत्येक तोंडातून वेगवेगळ्या गोष्टी बोलायचा, तीच अवस्था भाजपची आहे. एकीकडे संघाचे कार्यकर्ते विषारी बोलतात, तर दुसरीकडे हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच आहेत, असे संघप्रमुख मोहन भागवत म्हणतात.

    “जर हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए सारखाच आहे, तर मग जातीय द्वेष ते का पसरवतात आणि लव्ह जिहाद सारख्या मुद्यांची गरज काय आहे?” असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला. इंग्रजांच्या लोकांना विभाजित करा आणि राज्य करा या धोरणानुसार देशात खोट्या गोष्टी पसरवून हिंदू आणि मुस्लिमांची विभागणी केली जात आहे, असा आरोप सिंह यांनी केला.

    congress leader Digvijay Singh claims muslims will not be in majority in india ever

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य