वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातल्या 11 राज्यांमध्ये सन 2023 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या वर्षभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मोदी सरकारचा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्पात “इलेक्शन बजेट” मांडतील. लोकांना लॉलीपॉप सवलती देतील, असा आरोप विरोधकांनी आधी केला होता. Congress leader d. K. Shiv Kumar accepts it’s not an election budget
पण आता याच आरोपावरून विरोधक माघारी फिरण्याचे दिसत आहे. कारण काँग्रेस नेत्याने स्वतःच हे इलेक्शन बजेट नसल्याचे कबूल केले आहे. कर्नाटकात 2023 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. परंतु केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्नाटकाला काहीही मिळाले नाही. आम्हाला वाटले होते की निर्मला सीतारामन या मूळच्या कर्नाटकातल्या आहेत. त्यामुळे त्या कर्नाटकला अर्थसंकल्पाद्वारे काही देतील. पण त्यांनी काहीही दिलेले नाही, असे टीकास्त्र काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सोडले आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुका असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य फार महत्त्वाचे आहे. कारण काँग्रेस सह सर्व विरोधक निर्मला सीतारामन यांच्यावर इलेक्शन लॉलीपॉप बजेट मांडणार असल्याचा आरोप करत होते. पण आता स्वतः डी के शिवकुमार यांच्यासारखे काँग्रेस नेते कर्नाटकला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातून काहीही दिले नसल्याचा आरोप केला आहे, तेव्हाच त्यांनी एक प्रकारे हे इलेक्शन बजेट नसल्याचीच कबुली दिली आहे.
Congress leader d. K. Shiv Kumar accepts it’s not an election budget
महत्वाच्या बातम्या