• Download App
    धक्कादायक : काँग्रेस नेत्याकडूनच ऑक्सिमीटरचा काळाबाजार, 2 हजार रुपयांऐवजी 7 हजारांना विकताना रंगेहाथ अटक । Congress Leader Arrested For Black Marketing Of Oximeter in Indore MP

    धक्कादायक : काँग्रेस नेत्याकडून ऑक्सिमीटरचा काळाबाजार, 2 हजार रुपयांऐवजी 7 हजारांना विकताना रंगेहाथ अटक

    Black Marketing Of Oximeter : देशात सध्या कोरोना महामारीमुळे बेड्स, ऑक्सिजनसह औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. अशा संकटाच्या काळातही समाजकंटकांकडून जीवनावश्यक औषधांचा व उपकरणांचा काळाबाजार सुरू आहे. मध्य प्रदेशातही ऑक्सिमीटरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी काँग्रेस नेते यतींद्र वर्मा यांना रंगेहाथ अटक केली आहे. Congress Leader Arrested For Black Marketing Of Oximeter in Indore MP


    विशेष प्रतिनिधी

    इंदूर : देशात सध्या कोरोना महामारीमुळे बेड्स, ऑक्सिजनसह औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. अशा संकटाच्या काळातही समाजकंटकांकडून जीवनावश्यक औषधांचा व उपकरणांचा काळाबाजार सुरू आहे. मध्य प्रदेशातही ऑक्सिमीटरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी काँग्रेस नेते यतींद्र वर्मा यांना रंगेहाथ अटक केली आहे.

    ‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, इंदूरमध्ये काँग्रेस नेते यतींद्र वर्मा यांना पोलिसांनी ऑक्सिमीटरचा काळाबाजार करताना अटक केली. चढ्या दराने ऑक्सिमीटरची विक्री करत असल्याच्या तक्रारींनंतर खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचला होता.

    पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी यतींद्र वर्मा काँग्रेसचा नेता आणि सक्रिय सदस्य आहे. यतींद्र वर्मा ऑक्सिमीटरचा काळाबाजार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 2 हजार रुपये किंमतीचे ऑक्सिमीटर 7 हजार रुपयांना विकत असल्याचा आरोप होता. पोलिसांनी सापळा रचला आणि ग्राहक बनून त्याच्याकडे गेले. या सापळ्यात आरोप खरा ठरल्यानं वर्माला अटक करण्यात आली.

    तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी यतींद्र वर्माला फोन केला होता. पोलीस कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्य आजारी असल्याचं सांगत ऑक्सिमीटर हवं असल्याची मागणी केली. फोनवर त्यांनी ऑक्सिमीटर मागवले. त्यानंतर डिलिव्हरी द्यायला आला तेव्हा त्यानं ऑक्सिमीटरसाठी 7 हजार रुपये मागितले आणि पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. आरोपी यतींद्र वर्माचे सोशल मीडियावर राहुल गांधींबरोबरचे फोटो आहेत. तसंच वर्मा यांनी शिवराजसिंह सरकारविरोधात अनेक वक्तव्येही केलेली आहेत.

    एकीकडे अवघा देश कोरोना महामारीमुळे त्रस्त असताना ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर औषधाच्या काळ्या बाजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यात जर आता नेतेमंडळींकडूनच सर्वसामान्यांची लुट होत असेल तर काय करावं, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

    Congress Leader Arrested For Black Marketing Of Oximeter in Indore MP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!