विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत संविधानासंदर्भात बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला होता. त्या उल्लेखावरून काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शाह यांनी अपमान केला, असा दावा करूनच दिवसभर संसद परिसरात आणि देशातल्या काही भागांमध्ये मोठ्या आंदोलन केले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरे यांनी अमित शहा यांचा राजीनामा मागितला आणि त्यांनी राजीनामा दिला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळातून बडकर करावे, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन केली.
काँग्रेसच्या या दिवसभरातल्या प्रोपोगंडाला अमित शहा यांनी भाजप मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.
काँग्रेसकडे संविधानाबद्दल सकारात्मक बोलायला कुठला मुद्दा सोडला नसल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे माझ्या भाषणातला मूळ भाग एडिट करून केवळ अर्धवटच भाग जनतेसमोर आणला. त्यातून जनतेमध्ये गैरसमज पसरवला. पण वस्तुस्थिती अशी आहे, की मी ज्या राजकीय संस्कृतीतून येतो, ती राजकीय संस्कृती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कधीच अपमान करू शकत नाही, असे अमित शहा म्हणाले.
काँग्रेस कायमच बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात राहिली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1951 आणि 1954 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांचा पराभव घडवून आणला. पंडित नेहरूंनी नेहमीच आरक्षण विरोधात भूमिका घेतली. तशी पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली. ही सगळी डॉक्युमेंट्स आज उपलब्ध आहेत.
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा काँग्रेसने वारंवार अपमान केला. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. राजीव गांधींनी शहाबानू सारख्या प्रकरणांमध्ये संविधान विरोधी भूमिका घेतली. इंदिरा आणि राजीव गांधींनी देशात मंडल आयोग लागू करू दिला नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या पंतप्रधानांनी कायम ओबीसी आरक्षण विरोधातच भाषणे केली. याचे सगळे पुरावे संसदेच्या रेकॉर्डवर उपलब्ध आहेत, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
जनतेने काँग्रेसला सत्तेवरून बाहेर घालवल्यानंतरच काँग्रेसच्या नसलेल्या सरकारांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला. पंडित नेहरूंनी बाबासाहेबांचे जन्मस्थान महू मध्ये स्मारक उभारायला नकार दिला होता. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन पंतप्रधानांनी स्वतःलाच भारतरत्न किताबांनी सजवून घेतले, पण काँग्रेसच्या नसलेल्या सरकारांनी बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब दिला, याची आठवण अमित शाह यांनी करून दिली. मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेली राजीनाम्याची मागणी अमित शहा यांनी फेटाळून लावली.
Congress is anti-Ambedkar, anti-reservation presenting facts in distorted way: Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
- NCP’s lust for power : सत्तेची चटक लावल्याचे बसले चटके; अजितदादांच्या फोटोला पुण्यात मारले जोडे!!
- Deepak Mankar नको ते उद्योग करू नका अन्यथा.. दीपक मानकर यांचा भुजबळ समर्थकांना दम
- धर्माचे एकत्व व्यवहारातून प्रकट व्हावे : डॉ. मोहन भागवत