• Download App
    ''काँग्रेसचा इतिहासही दलित आणि मागासलेल्या लोकांबद्दल द्वेषाचा राहिलाय'', तेलंगणामध्ये मोदींचे विधान! Congress history has also been of hatred towards Dalits and backward people Modis statement in Telangana

    ”काँग्रेसचा इतिहासही दलित आणि मागासलेल्या लोकांबद्दल द्वेषाचा राहिलाय”, तेलंगणामध्ये मोदींचे विधान!

    काँग्रेसमुळेच अनेक दशकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला गेला नाही.

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांबाबत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची 2024 ची सेमीफायनल मानली जात आहेत. Congress history has also been of hatred towards Dalits and backward people Modis statement in Telangana

    अशा स्थितीत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोघांसाठी ही निवडणूक आव्हानात्मक राहिली आहे. यासोबतच प्रादेशिक पक्षही त्यांची व्होटबँक आणि प्रादेशिक मुद्द्यांच्या जोरावर लढत आहेत. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे निवडणूक सभेला संबोधित केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत सांगितले की, मी मडिगा समाजातील लोकांना सांगेन की, तुम्ही जितकं BRSपासून सतर्क राहायच आहे, तितकच काँग्रेसपासूनही सावध राहयचं आहे. बीआरएस दलित विरोधी आणि काँग्रेसही यामध्ये कमी नाही.

    बीआरएसने नवीन राज्यघटनेची मागणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि काँग्रेसचा इतिहासही असाच काहीसा आहे. काँग्रेसमुळेच अनेक दशकं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला गेला नाही.

    मोदींनी एका सभेत बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने अनेक सरकारं पाहिली आहेत, परंतु आमचे सरकार असे आहे की ज्याची सर्वोच्च प्राथमिकता गरीब कल्याण, वंचितांना प्राधान्य देणे. भाजपा ज्या मंत्रावर चालते, तो सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास आहे.

    Congress history has also been of hatred towards Dalits and backward people Modis statement in Telangana

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य