विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एखाद्या पक्षाचे दिवस फिरले की त्याने केलेले चांगले प्रयोग देखील फसतात याचाच प्रत्यय हिमाचल प्रदेशात आज काँग्रेसला येतो आहे. काँग्रेस मधली सर्वांत मोठी हायकमांडची घराणेशाही हिमाचल प्रदेशातली छोटी घराणेशाही संपवायला गेली आणि फसली!! Congress high command tried to end himachal Pradesh Pradesh dynasty politics, but failed
हिमाचल प्रदेशात काँग्रेसकडे पूर्ण बहुमत असताना पक्षाने राज्यसभेची जागा तर गमावलीच, पण आता काँग्रेस हायकमांडने हिमाचल प्रदेशातील घराणेशाही संपवून नेमलेले नवे मुख्यमंत्री देखील पूर्ण अडचणीत आले आहेत. त्यांनी बहुमत गमावले आहे.
हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह यांची घराणेशाही गेली 35 – 40 वर्षे अविरत सुरू होती. ते स्वतःच सहा वेळा मुख्यमंत्री बनले होते. पत्नी प्रतिभा सिंह यांना त्यांनी मंत्री आणि खासदार बनवले. मुलाला देखील मंत्री आणि आमदार बनवले. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी प्रतिभा सिंह किंवा मुलगा विक्रमादित्य सिंह यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती, पण काँग्रेसच्या सर्वांत मोठ्या म्हणजे हायकमांडच्या घराणेशाहीने हिमाचल मधील वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाची घराणेशाही संपवत सुखविंदर सिंग सुक्कू यांना मुख्यमंत्री केले आणि तिथेच मोठी “खटकी” पडली. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या सव्वा वर्षात राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने काल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. 6 आमदारांनी बंडखोरी करत काँग्रेस हायकमांडने दिलेले उमेदवार प्रख्यात वकील अभिषेक मनू सिंघवी यांना पाडले.
त्या पाठोपाठ आज वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची घोषणा करताना विक्रमादित्य सिंह इमोशनल झाले आपल्या वडिलांच्या पुतळ्यासाठी मॉल रोडवर हिमाचल सरकारला दो गज जमीन सुद्धा मिळू शकली नाही. ही आमच्यासाठी खूप शरमेची बाब आहे असल्या सरकार मध्ये आम्ही राहू शकत नाही, असे त्यांनी रडत सांगितले.
त्यामुळे हिमाचल प्रदेशातले सुखविंदर सिंग चुकू सरकार अल्पमतात आले असून पक्षाला सध्या 33 आमदारांचा पाठिंबा उरला आहे, तर भाजपला 34 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे.
काँग्रेस हायकमांडवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप होत होता. त्याची धार कमी व्हावी म्हणून काँग्रेस हायकमांडने हिमाचल प्रदेशातली वीरभद्र सिंह यांची घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न केला होता, पण अवघ्या दीड वर्षात त्या घराणेशाहीने पुन्हा उचल खाल्ली. काँग्रेसचे 6 आमदार फोडले आणि पक्षाचे सरकार अडचणीत आणले. काँग्रेस हायकमांडने छोटी घराणेशाहीचा संपवण्याचा प्रयोग हिमाचलमध्ये फसला आणि बहुमताचे सरकार गमवावे लागले.
Congress high command tried to end himachal Pradesh Pradesh dynasty politics, but failed
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!