• Download App
    काँग्रेस हायकमांडचे समितीला आदेश, उद्धवसेनेसह शरद पवार गटाच्या जागा खेचा, जागावाटपाचा तिढा वाढला|Congress High Command orders the committee to pull the seats of Sharad Pawar group along with Uddhav Sena, the rift of seat distribution has increased

    काँग्रेस हायकमांडचे समितीला आदेश, उद्धवसेनेसह शरद पवार गटाच्या जागा खेचा, जागावाटपाचा तिढा वाढला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा प्रचंड वाढला होता. शेवटपर्यंत नेते तडजोड करताना दिसून आले. शिवाय मुंबईच्या जागांवर काँग्रेसच्या नेत्यांनी ठाम भूमिका घेतली नसल्याचे आरोप मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच केला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये नियोजनाचा अभाव दिसून आला तरीसुद्धा राज्यात काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आणि जागावाटपाचे नियोजन करण्याच्या उद्देशानेच काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी एकूण १० सदस्यांची नियुक्ती केली. त्यात मुंबई काँग्रेसचे तीन पदाधिकारी आणि दोन मुस्लिम नेत्यांना घेण्यात आले आहे. उद्धवसेना आणि शरद पवार गटाशी सामंजस्याने बोलणी करून अधिकाधिक जागा खेचण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे.Congress High Command orders the committee to pull the seats of Sharad Pawar group along with Uddhav Sena, the rift of seat distribution has increased



    महाराष्ट्रात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक बहुमत मिळाले आहे. म्हणून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आधीपासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरली असून त्याचाच भाग म्हणून जागावाटपाच्या तडजोडीसाठी १० सदस्यांची समितीचे गठण केले आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाविकास आघाडीची जागावाटपाची बैठकसुद्धा घेण्यात येणार आहे, ज्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील चार जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामुळे विधानसभेतही काँग्रेस मुंबईत जादा जागा मागण्याचा दावा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठीच काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसह मुंबई काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना मिळून पहिल्यांदाच अशी १० नेत्यांची समिती केली असल्याचे दिसून येत आहे.

    ९६-९६-९६ च्या फाॅर्म्युल्यापुढे जा : हायकमांडच्या सूचना

    महिनाभरापूर्वी मविआ नेत्यांमध्ये झालेल्या प्राथमिक बोलणीत तिन्ही पक्षांना ९६ जागांचा फाॅर्म्युला समोर आला होता. तो दिल्लीश्वरांनी अमान्य केला. काँग्रेसने ९६ च्या पलीकडे जावे, असे समितीतील नेत्यांना बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

    मुंबईवर जास्त भर

    लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला यश मिळेल असे स्पष्ट दिसत असतानाही उद्धवसेनेला त्या जागा सोडण्यात आल्या होत्या. विधानसभेला तसे करण्याची गरज नाही. दलित, मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागा काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजेत, असा प्रयत्न करावा, असे नेत्यांना सांगण्यात आले आहे.

    बोलणीचे सर्वाधिकार नाना पटोलेंकडेच

    सूत्रांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांची बैठक मल्लिकार्जुन खरगे आणि इतर वरिष्ठांच्या उपस्थितीत झाली. त्यात प्रचार यंत्रणेसाठी नियुक्त केलेल्या सल्लागार समितीने पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशन केले. प्रचाराचे तीन टप्पे करावेत. त्यातील प्रत्येक टप्प्यावर कोणते मुद्दे मांडावेत. विरोधकांवर कोणत्या मुद्द्यांवर हल्लाबोल करावा याविषयी त्यात सूचना करण्यात आल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मविआमध्ये जागावाटपाची जबाबदारी राज्यस्तरीय समितीकडेच देण्यात आली. या समितीचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील. शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे नेमक्या किती जागा मागाव्यात, किती जागा खेचाव्यात याचे सर्वाधिकार पटोले यांना देण्यात आले आहेत.

    अशी आहे समिती

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमधील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डाॅ. नितीन राऊत, आरिफ नसीम खान, सतेज (बंटी) पाटील, तर मुंबई काँग्रेस समितीच्या अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड, आमदार अशोक (भाई) जगताप, अस्लम शेख यांनी समितीमध्ये नियुक्ती केली आहे

    Congress High Command orders the committee to pull the seats of Sharad Pawar group along with Uddhav Sena, the rift of seat distribution has increased

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!