• Download App
    देशात मोदी "लहर" नाही, मोदी "जहर"; काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची घसरली जीभ!! Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh

    देशात मोदी “लहर” नाही, मोदी “जहर”; काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची घसरली जीभ!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात चौथ्या टप्प्याचे मतदान संपून पाचव्या आणि सहाव्या टप्प्यासाठी प्रचाराची रणधुमाळी उडाली असताना काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांची जीभ आज घसरली. देशात मोदी लाट बिलकुलच नाही असा जागा करताना जयराम रमेश यांनी ही मोदी “लहर” नाही, तर मोदी “जहर” आहे असे अश्लाघ्य उद्गार काढले. Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh

    एएनआय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने जयराम रमेश यांना देशात मोदी लाट आहे का, म्हणजेच मोदी लहर आहे का?? असा प्रश्न विचारला. त्यावर चिडून जयराम रमेश म्हणाले, देशात मला कुठेही मोदी “लहर” दिसत नाही, पण मोदी “जहर” दिसते कारण मोदी प्रत्येक भाषणामध्ये जातीयतेचे जहर म्हणजे विष फैलावत आहेत. प्रत्येक भाषणामध्ये हिंदू – मुसलमान भेदभाव करत आहेत. त्यांना देशातल्या विकासावर, महागाई किंवा बेरोजगारीवर बोलायचे नाही. कारण त्यांच्याकडे या प्रश्नांवर उत्तरे नाहीत. म्हणून ते देशांमध्ये जातीयतेचे जहर फैलावत आहेत. म्हणून मला देशात मोदी “लहर” कुठे दिसत नाही तर मोदी “जहर” दिसते!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्लाबोल करताना जयराम रमेश म्हणाले, “सत्यमेव जयते” हे देशाचे ब्रीद वाक्य आहे, पण मोदींचे ब्रीद वाक्य “असत्यमेव जयते” असे आहे. ते देशाचे पंतप्रधान असले, तरी ते “ब्लफमास्टर” आहेत.

    पण आत्तापर्यंत मोदींवर अशी वैयक्तिक टीका फक्त जयराम रमेश यांनी केली असे नाही, तर त्याची सुरुवात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 2007 मध्येच “मौत के सौदागर” म्हणून केली होती. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनी “चहावाला” म्हणून त्यांना हिणवले होते. त्या पलीकडे जाऊन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यरच मोदींना उद्देशून “नीच आदमी” असे म्हणाले होते. त्यानंतर आता जयराम रमेश यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी “लहर” नव्हे, तर मोदी “जहर” दिसले आहे.

    Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के