• Download App
    पंतप्रधानांवर काँग्रेसचा आरोप : मोदींनी आपल्या संबोधनात चुकीची माहिती दिली, देशाची माफी मागावी!|Congress Gaurav Vallabh Criticizes PM Modi, Says PM Gave Wrong Info In Address To Nation Must Apologize To Country

    पंतप्रधानांवर काँग्रेसचा आरोप : मोदींनी आपल्या संबोधनात चुकीची माहिती दिली, देशाची माफी मागावी!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवारी राष्ट्राला संबोधित केले. राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीकरणावरील भारताच्या यशाबद्दल चर्चा केली. या भाषणानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चुकीची माहिती देऊन भ्रम पसरवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पीएम मोदींना देशाची माफी मागण्यास सांगितले आहे.Congress Gaurav Vallabh Criticizes PM Modi, Says PM Gave Wrong Info In Address To Nation Must Apologize To Country

    काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून सवाल केलाय की, देशाच्या 50 टक्के लोकसंख्येला कोविडची एकही लस मिळाली नाही आणि सरकारच्या अक्षमतेमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला, मग सेलिब्रेशन कशाचे सुरू आहे?



    देशात प्रथमच लस बनवल्याची बाब चुकीची : गौरव वल्लभ

    काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की, पंतप्रधानांनी अशी काही तथ्ये मांडली होती जी अर्धी अपूर्ण आणि चुकीचीही होती. यामुळे वैज्ञानिक समुदायात गोंधळ होऊ शकतो. आपल्याकडे येथे एक म्हण आहे की नीम-हकीम खतरा-ए-जान. पंतप्रधान ‘संपूर्ण राज्यशास्त्र’, ‘इव्हेंटॉलॉजी’ आणि ‘वस्त्रशास्त्र’ विषयी बोलू शकतात. पण त्यांनी आरोग्य आणि साथीसारख्या संवेदनशील विषयांवर चुकीची माहिती देऊ नये.

    गौरव वल्लभ यांनी दावा केला की, पंतप्रधान म्हणाले की, देशात पहिल्यांदा लस तयार करण्यात आली आहे. मला वाटते की हा भारताच्या शास्त्रज्ञ, औषध उद्योग, डॉक्टर, परिचारिका, कोरोना योद्ध्यांचा अपमान आहे. सत्य हे आहे की भारत आधीच लसींच्या उत्पादनासाठी एक प्रमुख केंद्र आहे.

    काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले की, टीबी नियंत्रण कार्यक्रम भारतात 1960च्या दशकात सुरू झाला. 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकाच वेळी सहा रोगांचे लसीकरण सुरू केले, पण त्यांचा फोटो कुठेही लावून जाहिरात केली नाही. 2011 मध्ये लसीकरण धोरण तयार करण्यात आले.

    वल्लभ म्हणाले की, पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, भारत जगातील पहिला देश बनला आहे जिथे लसींचे 100 कोटी डोस देण्यात आले आहेत. खरे तर 16 सप्टेंबर 2021 पर्यंत चीनमध्ये 200 कोटींहून जास्त डोस देण्यात आले आहेत.

    Congress Gaurav Vallabh Criticizes PM Modi, Says PM Gave Wrong Info In Address To Nation Must Apologize To Country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य