प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसने गुरुवारी बेंगळुरूत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. त्यात अमित शहा यांच्यावर प्रक्षोभक विधाने करणे, द्वेष पसरवणे व विरोधकांची प्रतिमा डागाळण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अमित शहा यांनी कर्नाटकातील एका सभेत राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास जातीय दंगली होतील, असे विधान केले होते. काँग्रेसने त्यांच्या याच विधानाप्रकरणी ही तक्रार दाखल केली आहे. Congress files FIR against Amit Shah, alleging that he made a provocative speech
अमित शहांसह भाजपच्या इतर नेत्यांविरोधातही तक्रार
काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला, डॉ. परमेश्वरा व कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी बंगळुरू येथील हाय ग्राउंड पोलिस ठाण्यात अमित शहांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अमित शहा यांच्याशिवाय भाजपच्या इतर बड्या नेत्यांसह विजयपुरा रॅलीचे आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही या प्रकरणी नाव घेण्यात आले आहे.
डीके शिवकुमार म्हणाले की, अमित शहा अशी कशी विधाने करू शकतात. याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही एका जाहीर सभेत शहा यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
तक्रारीत म्हटले – शहांचे भाषण खोट्या दाव्यांनी भरलेले
काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमित शहा यांचे भाषण खोट्या दाव्यांनी भरलेले होते. खोटे व निराधार आरोप करून काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करणे हा त्यामागील उद्देश होता. शहा यांना या माध्यमातून रॅलीत सहभागी झालेले लोक व इतर व्यासपीठांवरून भाषण पाहणाऱ्यांत जातीय विसंवादाचे वातावरण निर्माण करायचे होते.
शहा यांच्या भाषणाचा व्हिडिओही तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कलम 153, 505(2), 171G व 120B चा उल्लेख आहे.
सर्वच राजकीय पक्षांची ताकद पणाला
कर्नाटकात येत्या 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा होत आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी व मल्लिकार्जुन खरगे हे ही राज्यात सभा घेत आहेत.
Congress files FIR against Amit Shah, alleging that he made a provocative speech
महत्वाच्या बातम्या
- मौत ते सौदागर” ते “विषारी साप” व्हाया “कबर खुदेगी”; नरेंद्र मोदींना 91 वेळा काँग्रेसची शिवीगाळ!!
- जोडे पुसणारे राज्यकर्ते, उद्धव ठाकरेंची घसरली जीभ; वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या…; एकनाथ शिंदेंचे चोख प्रत्युत्तर
- सुदानमधून २४६ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले; भावूक महिला म्हणाली, ‘’पंतप्रधान मोदी…’’
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’