• Download App
    Shashi Tharoor काँग्रेसने स्वतःच केली शशी थरूर यांची वजाबाकी, पण नुसते भाजपला बोल लावण्यात काय हाशील??

    काँग्रेसने स्वतःच केली शशी थरूर यांची वजाबाकी, पण नुसते भाजपला बोल लावण्यात काय हाशील??

    काँग्रेस आणि खासदार शशी थरूर यांच्यातील जुगलबंदी थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. गांधी परिवाराने तर काँग्रेस मधून शशी थरूर यांची पक्षातून वजाबाकीच करून टाकलीय. शशी थरूर यांच्यासारख्या political asset ला काँग्रेसने political liability मानून दूर केलंय. मग त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या diplomatic assignments स्वीकारल्याबद्दल त्यांना उगाच दोष देण्यात काय मतलब आहे??

    वास्तविक शशी थरूर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी गाजवलेले नेते हा काँग्रेससाठी political asset ठरले होते. त्यांच्या बुद्धिमत्तेचा काँग्रेसने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगला वापर करून घ्यायला हवा होता. मोदींनी त्यांना कुठली assignment देण्याआधी काँग्रेसनेच त्यांना वेगवेगळ्या असाइनमेंट देऊन engage ठेवायला हवे होते, पण काँग्रेसच्या गांधी परिवार निष्ठ नेत्यांनी ते केले नाही. मग शशी थरूर यांच्यासारखे “उद्योगी” नेते गप्प राहिले नाहीत त्यांना दोष देण्यात काय मतलब आहे??



    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना योग्य वेळी उचलले. Operation sindoor च्या समर्थनासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवले. त्यांना रशिया दौऱ्यासारख्या योग्य special diplomatic assignment दिल्या. त्या त्यांनी पूर्ण केल्या. त्यांनी देशहिताचे काम केले. यातून मोदींना काँग्रेसमध्ये काड्या घालायच्या होत्या हे तर खरेच, पण मूळात काँग्रेसने अशा काड्या घालूनच का घेतल्या?? योग्य वेळी अचूक प्रतिडाव खेळून मोदींच्या चाली त्यांच्यावरच का उलटवल्या नाहीत??

    एरवी काँग्रेसचे सगळे नेते मोदींच्या काँग्रेसमुक्त घोषणेवर तोफा डागताना त्यांना देश काँग्रेस मुक्त करायचा आहे, पण भाजप काँग्रेस युक्त करायचा आहे असे बोलत असतात. त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत सगळे नेते आघाडीवर असतात, पण जे वैचारिक दृष्ट्या पक्षात आहेत आणि ज्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव मोठा आहे, त्यांच्या अनुभवाचा वापर करून घेणे हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे काम नव्हे का??

    एरवी राहुल गांधी दर दोन अडीच महिन्यांनी देशातून “गायब” होतात. ते कुठल्या देशांमध्ये जातात, याचा अनेकदा पत्ता लागत नाही. काँग्रेसवाले त्यांच्या दौऱ्याची अधिकृत माहिती देतातच असे नाही. मग राहुल गांधी जर असे देशोदेशी फिरू शकतात, तर काँग्रेसच्याच वतीने शशी थरूर यांना वेगवेगळ्या assignments देऊन परदेशांमध्ये पाठवायला, काँग्रेसची प्रतिमा वर्धन करायला काय हरकत आहे??, पण काँग्रेसने तसे काही केले नाही. त्या उलट शशी थरूर यांच्यासारखा political asset गमावून उगाचच मोदींना शिव्या देण्यात वेळ घालवतायेत.

    Congress does not use intellect of Shashi Tharoor but blame it on BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- जंगलराजमध्ये जास्त पगार म्हणजे आरजेडीसाठी जास्त खंडणी; तेजस्वी यांनी बंदुकीच्या धाकावर CM पद मिळवले

    CJI Ramana : माजी CJI रमणा म्हणाले- माझ्या कुटुंबावर बनावट खटले दाखल केले; हा सर्व माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होता

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडा शिकवला, आता अवकाश-सायबर युद्ध हे नवे आव्हान