काँग्रेसने खोटे बोलून सरकार आणले, पण ते चालवता आले नाही, असंही मोदींनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
चितोडगड : ” मुख्यमंत्री गेहलोत यांनी एक प्रकारे त्यांचे जाणे निश्चित असल्याचे मान्य केले आहे. भाजपाचे सरकार आल्यावर काँग्रेसच्या योजना पुढे न्याव्यात, असे त्यांनीच म्हटले आहे.” असे पंतप्रधान मोदी चित्तोडगड येथे म्हणाले आहेत. तसेच, याप्रसंगी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”मी अत्यंत दु:खी मनाने सांगतो की, गुन्हेगारीचा विचार केला तर राजस्थान अव्वल स्थानावर येते. अराजकता, दंगली, दगडफेक या बाबतीत आपले राजस्थान बदनाम आहे. महिलांवरील अत्याचार आणि दलितांवरील अत्याचारांमुळे आपले राजस्थान उद्ध्वस्त झाले आहे.” Congress countdown is on in Rajasthan Gehlot also knows that the government is going Modis statement in Chittorgarh
याचबरोबर ”काँग्रेसने खोटे बोलून सरकार आणले, पण ते चालवता आले नाही. बसताना, उठताना, झोपताना मुख्यमंत्री गेहलोत केवळ मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यात मग्न होते आणि अर्धी काँग्रेस त्यांना खुर्चीवरून हटवण्यात व्यस्त होती, पण लुटमारीच्या बाबतीत संपूर्ण काँग्रेस एकसंध राहिली. इथे गुन्हेगार आणि लुटारू स्वतःला सरकार समजत आहेत, असे सरकार एक दिवसही टिकू नये.” असेही मोदींनी सांगितले आहे.
याशिवाय पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”मुख्यमंत्री गेहलोत यांना माहित आहे की राजस्थानमधील आपले सरकार जाण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे. दिल्लीत बसलेल्या लोकांना विश्वास बसणार नाही, पण सरकार जात आहे हे गेहलोत यांना माहीत आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार आल्यानंतर त्यांच्या योजना बंद करू नयेत, अशी त्यांची विनंती आहे. गेहलोत तुम्ही पराभव स्वीकारला म्हणून धन्यवाद. तुम्ही प्रामाणिकपणे मान्य केले असेल तर मोदी तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रामाणिक आहेत. तुम्ही सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही मी देतो.”
Congress countdown is on in Rajasthan Gehlot also knows that the government is going Modis statement in Chittorgarh
महत्वाच्या बातम्या
- PM मोदी आज राजस्थान-मध्य प्रदेश दौऱ्यावर; दोन्ही राज्यांना देणार 26 हजार कोटींच्या प्रकल्पांची भेट
- पुण्यात ससून रुग्णालयाच्या परिसरातून तब्बल 2.14 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा भंडाफोड
- आता तो दिवस दूर नाही, जेव्हा POK पुन्हा भारतात येईल” – व्ही.के.सिंह
- निवडणुकीपूर्वी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन; दिल्लीत रामलीला मैदानात एकवटले सरकारी कर्मचारी