विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : देशातल्या विशिष्ट वृत्तवाहिन्यांच्या 14 अँकर्सच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज माघार घ्यावी लागली. अँकर्सच्या बहिष्कारच्या मुद्द्यावरून काँग्रेस मागे फिरली आणि सविनय विरोध आंदोलनावर आली. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्या हैदराबाद मधल्या पत्रकार परिषदेत हे घडले. Congress changed the language of boycott on anchors
काँग्रेसने आणि “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांनी 14 अँकर च्या कार्यक्रमांवर बहिष्कार घातल्याची बातमी समोर आल्यानंतर सगळीकडून काँग्रेसवर टीकेचा वर्षाव झाला. अनेकांनी हीच का ती माध्यम आणि अविष्कार स्वातंत्र्याचा ढोल पिटणारी काँग्रेस??, असा बोचरा सवाल केला. बहिष्कार घातलेल्या प्रत्येक अँकर्सने आपापली बाजू मांडत काँग्रेसच्या प्रवक्त्यांवर ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केली. त्यामुळे काँग्रेसला बॅकफूटवर जावे लागले आणि याचा बॅकफूटवर जात काँग्रेसने कोणत्याही अँकर्सवर बहिष्कार घातलेला नाही. ब्लॅकलिस्ट केलेले नाही, असे पवन खेडा यांना सांगावे लागले.
पण हे सांगताना त्यांनी चतुराईने महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग आंदोलनाचा आधार घेतला. काँग्रेस महात्मा गांधींच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. देशात नफरत आणि हिंसा फैलावणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचा आम्हाला अधिकार आहे. तो आवाज आम्ही उठवतो आहोत. आमच्या मनात कोणाचाही द्वेष नाही. आम्ही कोणावर बहिष्कार घातलेला नाही. बंदी लादलेली नाही किंवा कोणाला ब्लॅकलिस्ट ही केलेले नाही. त्यांना काय करायचे ते करू द्या. पण आम्ही त्यांच्यात सहभागी होणार नाही, असे पवन खेडा यांनी सांगून प्रत्यक्षात अँकर्स वरचा बहिष्कार कायम ठेवला.
अमन चोप्रा, नविका कुमार, सुशांत सिन्हा, अमिष देवगन, अर्नब गोस्वामी, रुबिया लियाकत आदी 14 अँकर्सवर “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांनी बहिष्कार घालून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जायला नकार दिला आहे. काँग्रेसने काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी त्याला बहिष्कार हे नाव टाळून जरी सविनय आंदोलनाचे नाव दिले असले, तरी तो बहिष्कार प्रत्यक्षात कायम असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
Congress changed the language of boycott on anchors
महत्वाच्या बातम्या
- Good News – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘या’ कालावधीत असणार टोल माफी!
- तैवानवर कब्जा करणार चीन, ब्लू प्रिंट केली जाहीर; लोकांना व्यवसायासाठी दाखवले आमिष
- महाराष्ट्र-मध्य प्रदेशमध्ये रेड अलर्ट, हिमाचल-उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाचा इशारा!
- जम्मू-काश्मीर : अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद, लष्कराची शोध मोहीम सुरूच!