विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेशात काँग्रेस हायकमांडने नव्या पिढीकडे पक्षाची सूत्रे सोपविली खरी, पण ती जिंकून नव्हे, तर दारुण पराभवानंतर! Congress changed its leadership in madhya Pradesh, but after humiliating defeat!!
मध्य प्रदेशात 77 वर्षीय कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निवडणूक लढवली, पण पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर खडबडून जागे होऊन काँग्रेस हायकमांडने कमलनाथ यांच्या जागी मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी 2023 च्या निवडणुकीत पराभूत झालेले तुलनेने तरुण असलेले नेते जितू पटवारी यांची नियुक्ती केली. त्याचबरोबर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी उमंग सिंगार आणि उपनेतेपदी हेमंत कटारे यांचीही निवड केली, पण काँग्रेसने ही सगळी राजकीय मशागत दारुण पराभवानंतर केल्याने पक्षाचे हसे झाले आहे!!
भाजपचा नेतृत्व बदल बिनबोभाट
मध्य प्रदेशात भाजपने शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रीपदी असताना देखील त्यांच्या चेहरा पुढे करून निवडणूक लढवली नव्हती. निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करून त्यांच्या जागी डॉ. मोहन यादव यांची निवड केली. भाजप मधला हा नेतृत्वाचा सांधा बदल बिनबोभाट पार पडला.
पण प्रत्यक्ष निवडणूक लढवताना कमलनाथ यांना बाजूला करून नव्या नेतृत्वाला पुढे करत मैदानात उतरण्याची हिंमत काँग्रेसने देखील दाखवली नव्हती. कमलनाथ यांचाच वृद्ध चेहरा काँग्रेसने जनतेसमोर ठेवला. निवडणूक जिंकली असती, तर कमलनाथ हेच मुख्यमंत्री झाले असते. पण आता पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर खडबडून जागे होऊन काँग्रेस हायकमांडने कमलनाथ यांना बाजूला केले.
ते स्वतः “निवृत्त” होऊन बाजूला झाले. त्यांना आपले चिरंजीव नकुल नाथ यांचे करियर देखील आपल्या मनाप्रमाणे “सेट” करता आले नाही काँग्रेसने कमलनाथ यांच्या ऐवजी जितू पटवारी यांना ने प्रदेशाध्यक्ष केले आणि त्यांच्याबरोबर उमंग सिंघार आणि हेमंत कटारे यांच्याकडे विधिमंडळ पक्षाची सूत्रे सोपवली. त्यामुळे नकुल नाथ यांचा पत्ता परस्पर कट झाला.
जितू पटवारी :
नोव्हेंबर 1973 मध्ये जन्मलेले जितू पटवारी ओबीसी नेते आहेत. 2013 मध्ये राऊळ विधानसभेतून पहिल्यांदा आमदार झाले. ते प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय मीडिया पॅनेलचे सदस्यही राहिले आहेत. याआधी ते मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2018 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा राऊळमधून निवडणूक जिंकली, मात्र तिसऱ्यांदा पटवारी यांना 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. 2018 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, तेव्हा ते उच्च शिक्षण, युवक आणि क्रीडा व्यवहार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.
उमंग सिंघार चौथ्यांदा आमदार
माजी उपमुख्यमंत्री जमुनादेवी यांचे पुतणे उमंग सिंगार धार जिल्ह्यातील गंधवानी येथून चार वेळा विजयी होऊन उमंग सिंघार विधानसभेत पोहोचले. दोन वेळा लोकसभेचे उमेदवार होते. कमलनाथ सरकारमध्ये मंत्री होते. ते काँग्रेसचे राष्ट्रीय सचिवही होते. झारखंड, गुजरात निवडणुकीत सहप्रभारीही होते. ते आदिवासी नेते आहेत.
हेमंत कटारे हे माजी विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारेंचे पुत्र
हेमंत कटारे हे माजी विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांचे पुत्र आहेत. 2013 मध्ये अटेर मतदारसंघातून आमदार झाले. 2018 च्या निवडणुकीत पराभव झाला. वडील अटेर मतदारसंघातून 4 वेळा आमदार आणि मध्य प्रदेश सरकारमध्ये गृहमंत्री राहिले आहेत. ते विरोधी पक्षनेतेही होते. ते ब्राह्मण नेते आहेत.
Congress changed its leadership in madhya Pradesh, but after humiliating defeat!!
महत्वाच्या बातम्या
- INDI आघाडीतल्या एका वृद्ध नेत्याचा पोक्त सल्ला; दुसऱ्याच्या भाषणात बेटकुळ्या!!
- इन्स्टा स्टार प्रिया सिंहवर कार घालणारा आरोपी अश्वजीत गायकवाडला अटक; लँड रोव्हरही जप्त
- भारतावर निर्बंध लादण्याची अमेरिकेतील सरकारी एजन्सीची मागणी; म्हटले- भारतात धार्मिक स्वातंत्र्य नाही
- पाक लष्करप्रमुख म्हणाले- काश्मीरबाबत भारताचा निर्णय अवैध; संयुक्त राष्ट्रप्रमुखांकडे काश्मिरींच्या इच्छेनुसार तोडगा काढण्याची मागणी
- उत्तराखंडमधील सुधारगृहात 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; दोन महिला कर्मचारी पीडितेला बाहेर घेऊन जायच्या; गुन्हा दाखल