विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुरत आणि इंदोर लोकसभा मतदारसंघांमधून काँग्रेस उमेदवारांनी माघार घेऊन पक्षाला झटका दिल्यानंतर ओडिशा देखील काँग्रेसला लोकसभेच्या उमेदवाराने तिसरा झटका दिला आहे. पुढील लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेसचे उमेदवार सुचरिता मोहंती यांनी काँग्रेस संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांना पत्र लिहून पक्षाचे लोकसभेचे तिकीट परत करून टाकले आहे. Congress candidate Sucharita Mohanty returned the Lok Sabha ticket to the party citing lack of money for campaigning
लोकसभा मतदारसंघात प्रचार मोहीम चालवण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. काँग्रेस पक्ष देखील आपल्याला निवडणूक लढवण्यापुरता पुरेसा फंड देत नाही. त्यामुळे आपण लोकसभेचे उमेदवारी पक्षाला परत करत आहोत, असे सुचरिता यांनी पत्रात नमूद केले आहे.
काँग्रेसने ओडिशा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतले सगळे उमेदवार जाहीर करून पुढील लोकसभा मतदारसंघात सुचरिता मोहंती यांना लोकसभा उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेसचे ओडिशा प्रभारी डॉ. अजय कुमार यांच्याकडे प्रचारासाठी फंड मागितले. परंतु, अजय कुमार यांनी स्पष्ट शब्दात इन्कार करत तुमच्या प्रचारासाठी तुम्ही स्वतःच फंड उभा राहा, अशी सूचना केली. त्यानंतर सुचरिता मोहंती यांनी प्रचारासाठी क्राउड फंडिंग करण्याचा प्रयोग करून पाहिला. परंतु तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. स्वतःच्या खिशातले पैसे घालून सुचरिता म्हणून त्यांना प्रचार करता येईना. त्यामुळे त्यांनी उमेदवारीच पक्षाला परत करून टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपण काँग्रेस पक्षाला जबाबदार धरत नसून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काँग्रेस पक्षाची बँक खाती सील केल्यामुळे पक्षाकडे कदाचित पुरेसा फंड नसावा, अशी शक्यता आहे सुचरिता यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
गुजरात आणि सुरत या दोन लोकसभा मतदारसंघांमधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आधीच आपली उमेदवारी मागे घेतली आहे त्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला आहे. त्या पाठोपाठ सुचरिता मोहंती यांनी पैशाच्या अभावाचे कारण देऊन उमेदवारी मागे घेतल्याने पक्षाला आणखी मोठा झटका बसला आहे.