विशेष प्रतिनिधी
रायपूर : एकीकडे सनातन धर्माला नावे ठेवायची, दुसरीकडे त्यातल्या अंधश्रद्धाच खऱ्या मानून वाटचाल करायची ही काँग्रेसची भीतीतून आलेली “परंपरा” आहे. ती “परंपरा” जपत काँग्रेसने छत्तीसगड आणि तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीत आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, पण ती देखील तोकडीच!!Congress candidate lists announced on the first garland of Navratri; But that too!!
छत्तीसगडमध्ये भाजपने 60 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले असताना काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी फक्त 30 जणांची बाहेर आली आहे. काँग्रेसच्या छत्तीसगड प्रभारी कुमारी शैलजा यांनी आम्ही 90 उमेदवारी एकाच वेळी जाहीर करू शकतो, अशा बाता तीनच दिवसांपूर्वी मारल्या होत्या. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. 90 च्या निम्मेही उमेदवार काँग्रेस जाहीर करू शकली नाही, तर फक्त 30 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने नवरात्राच्या पहिल्या माळेला जाहीर केली. कारण कोणत्याही काँग्रेस उमेदवाराला पितृपक्षात आपले नाव जाहीर व्हायला नको होते.
छत्तीसगड बरोबरच तेलंगणाची यादीही काँग्रेसने जाहीर केली, ती 50 उमेदवारांची आहे. त्या यादीलाही पितृपक्षाचाच अडथळा होता. पितृपक्ष संपून नवरात्राची पहिली माळ आल्याबरोबर काँग्रेसने तेलंगणातली यादी जाहीर केली. तेलंगण प्रदेश अध्यक्ष रेवंत रेड्डी कलंगुडातून निवडणूक लढणार आहेत, तर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव हे अंबिकापूर मधून मैदानात उतरणार आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मतदारसंघ अद्याप ठरायचा आहे.
पण एकीकडे सनातन धर्माला नावे ठेवायची आणि त्यातल्या अंधश्रद्धा मात्र निगुतीने पाळायच्या हे काँग्रेसचे दुटप्पी धोरण काँग्रेसच्या याद्यांमधून प्रसिद्ध करण्याच्या दिवसातून बाहेर आले आहे.
Congress candidate lists announced on the first garland of Navratri; But that too!!
महत्वाच्या बातम्या
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!
- विश्वचषक 2023 : पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पाकिस्तानवरील विजयाबद्दल टीम इंडियाचे केले अभिनंदन