विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : योगींच्या भगव्या वस्त्रांवर मल्लिकार्जुन खर्गे घसरले, तर सामोशाच्या संग्रामावरून भाजप नेत्यांनी खर्गेंना धुतले. Congress – BJP fight over saffron clothing of Yogi Adityanath
त्याचे झाले असे :
योगी आदित्यनाथ यांचा महाराष्ट्रातला झंजावात पाहून काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. योगी आदित्यनाथ महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात “बटेंगे तो कटेंगे” अशी भाषणे करून हिंदूंच्या एकजुटीचे महत्त्व पटवून देतात. ही बाब काँग्रेस नेत्यांना खटकली. त्याचे उट्टे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संविधान बचाव सभेत काढले. तुम्हाला भगवी वस्त्रे घालायची असतील, तर राजकारणातून संन्यास घ्या. भगवी वस्त्रे घालून प्रेमाची भाषा करायची, तर तुम्ही लोकांना तोडायची भाषा करत आहात, असा आरोप खर्गे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केला.
त्यावरून भाजपचे नेते संतापले. भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी खर्गे यांना परखड शब्दांत सुनावले. योगींच्या भगव्या वस्त्राची चिंता खर्गे यांच्यासारख्या सीनियर नेत्याने करू नये. त्यांनी आपल्या पक्षातल्या सामोशाचा संग्राम आणि जिलेबीचे व्यवधान या समस्या सोडवाव्यात, असा टोला नक्वी यांनी खर्गे यांना हाणला.
हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांच्यासाठी आणलेले सामोसे त्यांच्या सुरक्षारक्षकांनीच खाल्ले. त्याबद्दल त्यांच्या काँग्रेस सरकारने सीआयडीची चौकशी लावली. हरियाणात गोहानाची जिलबी निर्यात करायची आयडियेची कल्पना राहुल गांधींनी लढवली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना यश आले नाही. त्यामुळे या दोन्ही बाबींची खिल्ली देशभर उडवली गेली. त्यात नक्वी यांनी भर घातली.
Congress – BJP fight over saffron clothing of yogi adityanath
महत्वाच्या बातम्या
- Baba Siddiqui बाबा सिद्दीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी अटक ; अवघ्या 10 लाख रुपयांसाठी खून
- Jagannath Chattopadhyay बंगालमध्ये ४२ वर्षांची सत्ता असूनही काँग्रेसचे नाव मिटले गेले – जगन्नाथ चट्टोपाध्याय
- BJP Manifesto भाजपचा जाहीरनामा- शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नव्या नोकऱ्या; महिलांना दरमहा 2100 रुपये देणार
- Bangladesh बांगलादेशात ट्रम्प यांचा विजय साजरा करणे समर्थकांना महागात पडले!