नाशिक : बिहारमध्ये काँग्रेसने मोठी रणनीती आखली पक्षाने प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रण मैदानात उतरविले त्यांच्या प्रभावामुळे काँग्रेस पक्ष बिहारची निवडणूक जिंकू शकतो, असे दाखवायला सुरुवात केली पण काहीच वर्षांपूर्वी झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत नेमके काय झाले होते??, हे काँग्रेस कार्यकर्त्यांना आठवते तरी का??, असा सवाल विचारायची वेळ त्यामुळेच आली. Priyanka Gandhi
काँग्रेसने बिहारमध्ये मोठे कॉन्सन्ट्रेशन केले आहे. राहुल गांधींनी सुरुवातीलाच 50 मतदारसंघांमध्ये मतदार अधिकार यात्रा काढली त्यामध्ये त्यांनी कन्हैया कुमारला बिहारचा भावी नेता म्हणून पुढे आणायचा प्रयत्न केला. परंतु राहुल गांधींनी मध्येच ब्रेक घेतला आणि ते मलेशियाला निघून गेले. तिथे त्यांनी झाकीर नाईकची भेट घेतल्याचे सांगितले गेले. त्यानंतर राहुल गांधी बिहारमध्ये पाटण्यात सदाकत आश्रमात झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सामील झाले. तिथून काँग्रेसने बिहारमध्ये घट्ट पाय रोवून उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेस पक्षाने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही. मात्र त्यांच्याकडून राहुल गांधींसाठी पंतप्रधान पदाचा पाठिंब्याचा शब्द घेतला. Priyanka Gandhi
– महिलांशी संवादाची जबाबदारी
बिहारमध्ये भाजप आणि जदयू यांना हरवू असा पण काँग्रेसने केला. हा पण पूर्ण करण्यासाठीच काँग्रेसने पुढची रणनीती आखत प्रियांका गांधींना निवडणुकीच्या रण मैदानात उतरविले. त्यांच्यावर बिहार मधल्या महिलांची संवाद साधायची जबाबदारी सोपविली. आता प्रियांका गांधी सदाकत आश्रमातूनच या मोहिमेची सुरुवात करणार आहेत तिथे आज पहिल्यांदा त्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्या बिहार मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये जाऊन महिला मेळावे घेणार आहेत. प्रियांका गांधींच्या दौऱ्यातून महिला मतदारांना स्वतंत्रपणे आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
– उत्तर प्रदेशात दारुण पराभवाचा सामना
पण यावेळी प्रियांका गांधी यांच्याकडे बिहार मधली महिला मतदारांच्या संवादाची जबाबदारी सोपवताना काँग्रेसने विशिष्ट काळजी सुद्धा घेतली आहे ती म्हणजे काँग्रेसने बिहारची प्रभारी पदाची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपविलेली नाही. कारण प्रियांका गांधींचा प्रभारी पदाचा अनुभव काँग्रेससाठी चांगला राहिलेला नाही. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने प्रियांका गांधींवर प्रभारी पदाची जबाबदारी सोपविली होती. त्यांनी राज्यात तब्बल अडीच तीन महिने तळ ठोकला होता. त्यांच्याच सल्ल्याने काँग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. पण प्रियांका गांधींच्या प्रभारी पदाच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा त्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. काँग्रेसचे फक्त 11 आमदार निवडून आले होते. काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातल्या पराभवाचे खापर प्रियांका गांधी यांच्यावर फोडले नाही. ते तिथल्या संघटनेवरच फोडले. पण आता मात्र बिहारमध्ये त्यांच्यावर निवडणुकीची विशिष्ट जबाबदारी सोपविताना त्यांना बिहारचे प्रभारी केलेले नाही.
Congress big strategy in Bihar; Priyanka Gandhi fielded in the elections
महत्वाच्या बातम्या
- Ladakh : लडाख हिंसा- 4 ठार, 72 जखमी; राज्याचा दर्जा मागणाऱ्या आंदोलकांनी भाजप कार्यालयाला आग लावली
- नाव महागठबंधन, यात्रा मात्र वेगवेगळ्या; तरीही बिहारमध्ये बळकट भाजपला हरविण्याचा दावा!!
- State Government : महाराष्ट्रात पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा दिलासा; मृतांच्या वारसांना ४ लाख, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई
- महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी संघासह सगळीकडून मदतीचा ओघ; मुख्यमंत्री निधीलाही भरघोस मदत