• Download App
    काँग्रेसने 46 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, महाराष्ट्रातील केवळ चार जागांचा समावेश! Congress announced the fourth list of 46 candidates including only four seats in Maharashtra

    काँग्रेसने 46 उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर, महाराष्ट्रातील केवळ चार जागांचा समावेश!

    जाणून घ्या, महाराष्ट्रामधील कोणत्या चार जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली :  काँग्रेस पक्षाने शनिवारी 46 लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत पक्षाने दिग्विजय सिंह, अजय राय आणि कार्ती पी चिदंबरम यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे समाविष्ट केली आहेत. काँग्रेसने चौथ्या यादीत महाराष्ट्रातील चार जागांवरील उमेदवार घोषित केले आहेत. तर चंद्रपूर जागेचा निर्णय झालेला नाही. तेथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर हा वाद अद्याप सुटलेला नाही. Congress announced the fourth list of 46 candidates including only four seats in Maharashtra

    महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया या मतदारसंघात डॉ. प्रशांत पडोळे, नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकमधून रश्मी बर्वे आणि गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.


    हिमाचलमध्ये काँग्रेसचे सहा बंडखोर आमदार भाजपमध्ये, तीन अपक्ष आमदारांचाही प्रवेश


    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह राजगडमधून रिंगणात उतरले आहेत, तर अजय राय वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप खासदार रमेश बिधुरी यांना संसदेत शिवीगाळ करणारे बहुजन समाज पक्षाचे (BSP) नेते दानिश अली यांना उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

    काँग्रेस नेते पीएल पुनिया यांचा मुलगा तनुज पुनिया यांना उत्तर प्रदेशातील बारा बांकी येथून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. तामिळनाडूचे विद्यमान खासदार मणिकम टागोर पुन्हा एकदा विरुधुनगरमधून निवडणूक लढवणार आहेत.

    Congress announced the fourth list of 46 candidates including only four seats in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित