• Download App
    सांगलीचा वचपा विधान परिषद निवडणुकीत; ठाकरे गटाची सूचना डावलून काँग्रेसची प्रज्ञा सातवांना उमेदवारी!! Congress announced pradnya satav's candidature against the will of shivsena UBT

    सांगलीचा वचपा विधान परिषद निवडणुकीत; ठाकरे गटाची सूचना डावलून काँग्रेसची प्रज्ञा सातवांना उमेदवारी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसची इच्छा डावलून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार मैदानात उतरवला होता. पण वसंतदादांच्या नातवानेच बाजी मारत शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. आता त्यापलीकडे जाऊन काँग्रेसने विधान परिषद निवडणूक सांगलीचा वचपा काढला. काँग्रेसने ठाकरे गटाचा आग्रह डावलून प्रज्ञा राजीव सातव यांनाच विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी जाहीर केली. Congress announced pradnya satav’s candidature against the will of shivsena UBT

    प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.

    ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांचा उमेदवारीला विरोध 

    हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली होती. नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरेंनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाबुराव कदम यांचा दारुण पराभव केला. त्याचवेळी त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या विषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तक्रार केली होती, पण काँग्रेसने खासदार आष्टीकर यांची सूचना मान्य केली नाही.

    2021 मध्ये देण्यात आली होती संधी 

    काँग्रेस नेते राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या उमेदवारीला पत्राद्वारे मंजूरी दिली होती. त्यांनंतर पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

    Congress announced pradnya satav’s candidature against the will of shivsena UBT

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistani Drones : सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये LoC वर 5 ड्रोन दिसले:दावा- पाकिस्तान घुसखोरीच्या प्रयत्नात; सैन्याचा प्रतिहल्ला, शोधमोहीम सुरू

    CDS Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूर थांबले आहे, संपले नाही, पाक वाईट रीतीने हरला

    Chief Vikram Sood : माजी रॉ प्रमुख सूद म्हणाले-पाकिस्तानसोबत शांतता शक्य नाही; त्यांच्या नेत्यांचा दावा- गैर-मुसलमानांविरुद्ध जिहाद सुरू राहील