• Download App
    RSS संघावर बंदीच्या काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या नुसत्याच बाता; प्रत्यक्षात संघ किती वाढलाय, ते आकड्यांत वाचा!!

    संघावर बंदीच्या काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या नुसत्याच बाता; प्रत्यक्षात संघ किती वाढलाय, ते आकड्यांत वाचा!!

    संघावर बंदीच्या काँग्रेस आणि समाजवाद्यांच्या नुसत्याच बाता; प्रत्यक्षात संघ किती वाढलाय, ते आकड्यांत वाचा!!, असं म्हणायची वेळ काँग्रेस आणि समाजवादी नेत्यांच्या राजकीय वक्तव्यांनी आणि राजकीय वर्तनाने आणली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणायच्या नुसत्याच बाता मारल्या. भारतात जे जे काही वाईट घडतेय, त्यासाठी संघच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. पण प्रत्यक्षात त्याला आधार देणारे कुठलेही पुरावे त्या दोघांनी दिले नाहीत किंवा प्रत्यक्षात संघ बंदीचे कुठले राजकीय किंवा कायदेशीर पाऊलही ते उचलू शकले नाहीत.

    या पार्श्वभूमीवर संघाच्या शताब्दीच्या वर्षात संघ नेमका किती, कसा आणि कुठे वाढलाय??, यांची सविस्तर आकडेवारी संघानेच अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मांडली. ज्यामुळे खरंतर काँग्रेसच्या नेत्यांचे, समाजवाद्यांचे आणि संघ विरोधकांचे डोळे उघडून पांढरे झाले पाहिजेत. संघावर बंदी आणायच्या नुसत्याच बाता मारण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या वाढीसाठी आणि संघाचा मुकाबला करायसाठी खरे परिणामकारक उपाय योजले पाहिजेत.

    संघाची आकडेवारी अशी :

    •  विजयादशमी कार्यक्रम : 62,555
    •  गणवेशात स्वयंसेवक उपस्थित : 32,45,141
    •  पथ संचलने : 25000; गणवेशात स्वयंसेवक उपस्थित : 25,45,800
    •  20204 ते 2025 ऑक्टोबर : 10000 नवे काम सुरू
    •  2025 : शाखांची एकूण संख्या : 55052 ठिकाणी, 87398 शाखा भरतात; शाखांच्या संख्येत 15000 ने वाढ
    •  साप्ताहिक मिलने : 32,362
    •  पुढील वर्षभरात पंच परिवर्तन हिंदू संमेलनांचे आयोजन
    •  ग्रामीण भाग : 45000, शहरी भाग : 35000

    ही आकडेवारी संपूर्ण भारतातील कुठल्याही संघटनेच्या पेक्षा जास्त आहे. अगदी कम्युनिस्ट पार्ट्यांच्या केडर पेक्षाही जास्त आहे. याला अपवाद असलाच, तर चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या सक्तीच्या सदस्य संख्येचा असू शकतो.

    पण काही असले तरी संघाचा विस्तार किती व्यापक आणि समाजात खोलवर झालाय हे सांगणारी ही आकडेवारी आहे. संघावर बंदी आणायची भाषा करणारे काँग्रेस आणि समाजवादी सध्या आकडेवारीच्या बाबतीत संघाच्या जवळपास सुद्धा पोहोचत नाहीत.

    – काँग्रेसचा प्रभाव घटला, कारण…

    काँग्रेसने आपली मूलभूत आणि अंगभूत विचारसरणी सर्वसमावेशकता सोडून दिली आणि केवळ नेतृत्वाची संकुचित वृत्ती स्वीकारली, ती संघटनेवर लादून ठेवली, त्या वेळेपासून काँग्रेसची घसरण झाली. अन्यथा काँग्रेस जोपर्यंत लोकांची चळवळ होती, तोपर्यंत संघटना म्हणून, संख्या म्हणून आणि राजकीय विचार प्रणाली म्हणून तिचा प्रभाव संपूर्ण भारतभर होता.



    – उफराटे समाजवादी

    समाजवाद्यांच्या बाबतीत सगळेच उफराटे होते. सुरुवातीला समाजवादी वैचारिक दृष्ट्या नुसतेच उच्च पण राजकीय व्यवहार दृष्ट्या भोळे किंबहुना बावळट होते. राजकीय वर्तन व्यवहार कशाशी खातात, हे त्यांना समजतही नव्हते. त्यामुळे ते राजकीय दृष्ट्या सतत अपयशी ठरले. ते वैचारिक प्रभाव सुद्धा टिकवून ठेवू शकले नाहीत. त्यानंतरचे समाजवादी तद्दन जातिवादी निघाले. म्हणूनच त्यांनी मुस्लिम + यादव वगैरे समीकरणे उदयाला आणून काही काळापुरती सत्ता हस्तगत केली. पण केवळ संकुचित समीकरणांमुळे ती सत्ता सुद्धा ते टिकवू शकले नाहीत.

    यात कुठल्या नेत्यांची नावे लिहून त्यांचा अधिक्षेप करण्याचे कारण नाही, पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. काँग्रेस आणि समाजवादी यांची व्यापकता हरवली, नेमकी त्याच वेळी संघ आणि संघ परिवाराने ती व्यापकता स्वीकारली. हे खरे यातले इंगित आहे.

    – संघ कसा बदलला??

    काँग्रेस प्रभावी असण्याच्या काळात त्यावेळी संघाचा नुसता विचार व्यापक होता, पण कृती तेवढी व्यापक नव्हती आणि भाषा तर बिलकुल पुरोगामी नव्हती. त्यावेळी संघ आणि संघ परिवार राजकीय आणि सामाजिक अर्थाने खूपच मर्यादित होता. संघ नेतृत्वाच्या राजकीय आणि सामाजिक विचारांच्या मर्यादेमुळे संघाची वाढही मर्यादित राहिली होती. पण 1970 – 75 च्या दशकानंतरच्या संघाच्या नेतृत्वाने संघाच्या सगळ्या मर्यादा ओळखल्या. संघाच्या त्यावेळच्या नव्या नेतृत्वाने मर्यादांचे कवच भेदले. समाजाच्या विविध क्षेत्रांची आव्हाने आणि आवाहने ओळखली. समाजाच्या विविध स्तरांमध्ये काम करताना आपल्याला संघटनेत आणि विचार + वर्तनात अमुलाग्र परिवर्तन केले पाहिजे हे लक्षात घेतले आणि संघ नेतृत्वाने त्या पद्धतीची व्यापक आणि विस्तारित भूमिका स्वीकारली. तशी जाणीवपूर्वक कृती केली. त्यानंतर संघाची खऱ्या अर्थाने वाढ झाली. संघाने राजकीय आणि सामाजिक परिवर्तन मनापासून स्वीकारले. त्याचा संघाला लाभ झाला. त्याचाच परिणाम संघ विस्ताराच्या आकड्यांमधून समोर आला. हे नेमकेपणाने लक्षात घ्यायची आवश्यकता आहे. नुसत्या संघावर बंदी आणायच्या बाता मारून उपयोगाचे नाही.

    Congress and socialists insists ban on RSS, but RSS growth by leapes and bounds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Darbar : 4 वर्षांनंतर सरकार पुन्हा जम्मूमधून चालेल; श्रीनगरमधून 6 लाख कर्मचारी स्थलांतरित होतील; 3 नोव्हेंबरपासून काम सुरू

    काँग्रेसच्या डोक्यावर कट्टा ठेवून राजदने चोरलेय मुख्यमंत्रीपद; पण मोदींनी सांगितलेली बात अंदर की, की बिहार मधले जाहीर भांडण??

    बिहार मध्ये राहुल गांधींनी तलावात मारली उडी; निवडणूक प्रचार करण्याऐवजी केली मासेमारी!!