विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष पाहतोय 2004 च्या राजकीय चमत्काराचे स्वप्न, शरद पवारांना दिसतोय 1977 चा जनता पक्ष, तर पंतप्रधान मोदी यांचे पुढच्या सरकारच्या बांधणीकडे लक्ष!!, अशी लोकसभा निवडणुकीतल्या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या मतदानानंतरची राजकीय अवस्था आहे. Congress and sharad pawar became political nostalgic, but PM Modi contemplating the futuristic plans
काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय इतिहासातल्या सर्वांत कमी लोकसभेच्या जागा 2024 मध्ये लढवतो आहे. काँग्रेसने 101 जागा आपल्या मित्र पक्षांना वाटून देऊन 328 जागांवर स्वतः हाताचा पंजा या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, तरी देखील काँग्रेस नेत्यांना 2004 मध्ये जो चमत्कार घडला, तसाच राजकीय चमत्कार 2024 मध्ये घडण्याची आशा आणि अपेक्षा आहे.
2004 मध्ये वाजपेयी सरकार अस्तित्वात असताना इंडिया शायनिंगची घोषणा जोरात होती. या घोषणेतून वातावरण निर्मिती केल्याने भाजपला सत्तेवर येण्याचा आत्मविश्वास होता. पण तो प्रत्यक्षात आत्मघात ठरला आणि काँग्रेस मित्र पक्षांचा सत्तेवर आली. आता मोदींची गॅरंटी ही घोषणा जोरात आहे, पण 2004 सारखी इंडिया शायनिंगच्या घोषणेसारखीच तिच्या अवस्था होऊन काँग्रेसला संधी मिळेल, असे स्वप्न काँग्रेसचे नेते 2024 मध्ये बघत आहेत.
एकीकडे काँग्रेस नेते असे 2004 च्या राजकीय चमत्काराच्या स्वप्नांमध्ये रमान झाले असताना दुसरीकडे शरद पवारांना मात्र “2024” मध्ये “1977” दिसत आहे. 1977 मध्ये जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी यांच्या प्रेरणेतून जसा जनता पक्ष स्थापन झाला आणि त्याने काँग्रेसला पराभूत केले तसेच सगळे विरोधी पक्ष मोदी विरोधात एकत्र येतील आणि 2024 मध्ये भाजपला पराभूत करतील अशी आशा आणि अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. त्या पलीकडे जाऊन पवारांनी राहुल गांधींची स्वीकारार्हता मोरारजी देसाईंपेक्षा जास्त असल्याचा “जावईशोध” लावला आहे. त्याच वेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकते, अशीही भाकीतरुपी पुडी पोलीस सोडली आहे.
पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मुलाखतींमधून आपला पुढचा 100 दिवसांचा प्लॅन तयार आहे. 4 जून नंतर आपण एकही दिवस वाया घालवणार नाही. नवीन सरकार ताबडतोब स्थापन करून आपण स्वतःच निश्चित केलेल्या अजेंड्यावर वेगाने वाटचाल करू. काही निश्चित आणि ठोस निर्णय पहिल्या 100 दिवसांतच करू, असे आधीच स्पष्ट केले आहे.
मोदी नव्या सरकारच्या कारकिर्दीतल्या पहिल्या 100 दिवसांत नेमके कोणते आणि कसे निर्णय घेणार?? राज्यघटनेच्या 75 वर्षांचा कोणता कार्यक्रम असणार??, वक्फ बोर्ड कायदा, 1991 चा प्रार्थना कायदा, लव्ह जिहाद विरोधातील कायदा या 100 दिवसांमध्ये करणार की ते वायदे थोडेसे पुढे ढकलणार?? तसेच आर्थिक सुधारणा धोरण संदर्भात कोणती पावले उचलणार??, या संदर्भात मोदींच्या मुलाखतीतून सूचक वक्तव्य आली आहेत. त्यामुळेच त्याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
पण एकूण एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भविष्यवेधी निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत दिसताहेत, तर काँग्रेस आणि शरद पवारांसारखे नेते इतिहासात रममाण झालेले दिसत आहेत.
Congress and sharad pawar became political nostalgic, but PM Modi contemplating the futuristic plans
महत्वाच्या बातम्या
- देवेंद फडणवीस म्हणाले- ज्यांचा एका नेतृत्वावर विश्वास नाही त्यांच्या मागे देश जाणार नाही; इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्यच!
- झारखंड: EDने मंत्री आलमगीर आलम यांचे पीएस संजीव लाल अन् त्यांच्या सहाय्यकास केली अटक
- पंतप्रधान मोदींनी अहमदाबादला जाऊन मतदानाचा हक्क बजावला!
- सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!