विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेत घुसखोरीच्या कारस्थानाचे मास्टरमाईंड काँग्रेसी आणि कम्युनिस्ट, याच मुद्द्यावर लोकसभेत गदारोळ करणारे खासदारही काँग्रेसीच, परिणामी 5 खासदार निलंबित!!, ही आजच्या लोकसभेतील कारवाई आहे. Congress and Communists mastermind the Parliament Infiltration Conspiracy
संसदेत घुसखोरी करण्याच्या कारस्थान रचणारी अख्खी टोळी काँग्रेसी आणि कम्युनिस्ट निघाली. त्यांनी प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगतसिंगांच्या नावाचा गैरवापर करून त्यांच्या नावाने फॅन क्लब स्थापन केला आणि त्याद्वारेच कारस्थान रचून काल लोकसभेत घुसखोरी केली. या कारस्थानातील महिला हरियाणातील नीलम आझाद ही म विधानसभा निवडणुकीतली काँग्रेसची प्रचारक होती. त्याच बरोबर शेतकरी आंदोलनात सामील झाली होती. संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून तिला अटक झाल्यानंतर तुरुंगातून तिची सुटका करण्यासाठी किसान मोर्चा आक्रमक झाला आहे.
पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावे अशी मागणी करत काँग्रेस खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला. त्यापलीकडे जाऊन नवी संसद सुरक्षित नाही असे नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागितला.
संसदेत सुरक्षाभंग झाला. तो काँग्रेस आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या युवकांनी केला. मात्र, त्याला भाजपचे खासदार प्रतापसिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरून काँग्रेसच्या खासदारांनी गदारोळ केला. त्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी आज काँग्रेस खासदारांना उर्वरित हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यंत निलंबित केले.
कोण आहेत कारवाई केलेले खासदार??
टीएन प्रथापन, हीबी एडेन, एस जोथीमनी, राम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस हे काँग्रेसचे 5 खासदार सरकार विरुद्ध लोकसभेत गदारोळ करत होते. ते सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करून असभ्य वर्तन करत होते. त्यामुळे लोकसभेच्या सभापतींनी या पाच खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
Congress and Communists mastermind the Parliament Infiltration Conspiracy
महत्वाच्या बातम्या
- संसदेतले घुसखोर दाखवायला गेले बेरोजगारी; प्रत्यक्षात निघाले काँग्रेसी – डावे आंदोलनजीवी!!
- मध्य प्रदेशात “मोहन यादवी” कायदेशीर दंडा सुरू; मशिदींवरच्या लाऊड स्पीकरला चाप; खुल्यावर मांस विक्रीलाही बंदी!!
- धीरज साहू यांच्या घरात सापडलेल्या रोख रकमेनंतर आता घरातील सोन्याचा शोध घेण सुरू
- संसद घुसखोरीत अटक झालेली नीलम सामील होती फुटीरतावाद्यांच्या शेतकरी आंदोलनात; चौघांच्या कारस्थानाचा उलगडा!!