नाशिक : केरळ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भाजप B Team आहे पण नेमकी कुणाची??, असा सवाल आज समोर आला. कारण केरळमध्ये भाजप बी टीम असल्याच्या पोझिशन वर पोचल्याचे निदान आरोप प्रत्यारोपांमधून तरी समोर आले. BJP B Team
एरवी केरळमध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडी आणि कम्युनिस्ट प्रणित डावी लोकशाही आघाडी यांच्यात लढत होती आणि आहे केरळमध्ये या दोन्ही आघाड्या आलटून पालटून सत्तेवर आल्या. भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला तिथे कुठली स्थानच नव्हते.
– भाजपचे राजकीय अस्तित्व वाढले
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशिष्ट शक्ती होती आणि आहे, पण भाजपला त्या संघटन शक्तीचे रूपांतर राजकीय यशात करणे अद्याप तरी जमले नव्हते. पण 2021 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि त्यानंतर 2025 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला राजकीय अस्तित्व मिळाले. तिरुवनंतपुरम या राजधानीच्या शहरात भाजपची सत्ता आली. त्यामुळे भाजप हा पक्ष A force 2 reken with अशा स्वरूपाचा तरी बनला थोडक्यात केरळमध्ये भाजपची राजकीय दृष्ट्या दखल घेतली पाहिजे, याची गरज काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडी आणि कम्युनिस्ट प्रणित डावी लोकशाही आघाडी यांना निर्माण झाली. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर भाजप त्यांची बी टीम असल्याचा आरोप केला.
– विजयन आणि राहुल गांधी यांचे परस्पर विरोधी आरोप
काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रयोग करून केरळ मधल्या मतदारांना भाजपच्या दिशेने ढकलले, असा आरोप केरळचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला, तर कम्युनिस्ट पार्टी भाजपला केंद्रीय पातळीवर आव्हान देऊ शकत नाही म्हणून केरळचे कम्युनिस्ट सरकार भाजपला छुपी मदत करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून भाजपचे केरळ मधले राजकीय अस्तित्व आता केवळ नगण्य उरले नाही हेच सिद्ध झाले. काँग्रेसला आणि कम्युनिस्टांना भाजपची दखल घेतल्याशिवाय सत्तेवर येता येणार नाही आणि केरळ मधले राजकारण हाकता येणार नाही, हेच स्पष्ट झाले.
– मोदींचा प्रचारात धडाका
याच राजकीय पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलक्कड आणि त्रिशूर मध्ये जाऊन भाजपच्या प्रचाराची जोरदार आघाडी उघडली. त्यांनी एकाच वेळेस काँग्रेस आघाडी आणि कम्युनिस्टांची आघाडी यांना घेरले. या दोन्ही आघाड्यांनी केरळचे प्रचंड नुकसान केले म्हणून भाजपला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आता केरळ मधली जनता भाजपला कोणत्या पक्षाची B Team ठरविणार की भाजपला स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व वाढवायला मदत करणार, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
Congress and communists accuses each other as BJP B Team
महत्वाच्या बातम्या
- आसाम मधल्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षांना मनमोहन सिंग यांची आठवण; मोदींवर विश्वासघाताचा आरोप!!\
- दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील??
- Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता
- Bengaluru Professor : प्रोफेसरने विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटले; पीडितला पाठिंबा दिल्याने इतर विद्यार्थ्यांना निलंबित केले