• Download App
    एकाच परिवाराने स्वातंत्र्य दिल्याचे काँग्रेस सांगते, पण ते तंट्यामामा, भीमा नायक, बिरसा मुंडांना विसरले; शिवराज सिंग चौहानांचा हल्लाबोल!! Congress always felt freedom is given by one family only

    एकाच परिवाराने स्वातंत्र्य दिल्याचे काँग्रेस सांगते, पण ते तंट्यामामा, भीमा नायक, बिरसा मुंडांना विसरले; शिवराज सिंग चौहानांचा हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था

    भोपाळ : काँग्रेसचे नेते आत्तापर्यंत एकाच परिवाराने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले असे जनमानसावर ठसवत होते. नेहरू – गांधी आणि इंदिरा गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले, असे ते म्हणत होते. पण ते प्रख्यात क्रांतिकारक तंट्यामामा भिल्ल, भीमा नायक आणि बिरसा मुंडा यांच्या सारख्या महान आदिवासी नायकांना विसरले, असा हल्लाबोल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केला आहे.Congress always felt freedom is given by one family only

    रेल्वे स्थानकाचे नामांतर तंट्या मामा भिल्ल असे केल्यानंतर ते बोलत होते. काँग्रेसने देशातल्या जननायकांना कायमच दूर सारले आहे. ते एकाच परिवाराची आरती करताना दिसत आहेत. परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य परिवारांनी बलिदान केले आहे. कष्ट भोगले आहेत, याची शिवराज सिंग चौहान यांनी आवर्जून आठवण करून दिली. देश कोणत्या एका परिवाराच्या प्रयत्नांमुळे नव्हे तर असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि प्रयत्नांमुळे स्वतंत्र झाला आहे, असे ते म्हणाले.

    महान जननायक बिरसा मुंडा यांची जयंती देशात प्रथमच जनजातीय दिवस म्हणून साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला, हे शिवराज सिंग यांनी आवर्जून सांगितले. मध्य प्रदेश सरकारने आदिवासींसाठी विविध योजना आणल्या आहेत. इतकेच काय तर त्यांचे पारंपारिक मद्य देखील आता हेरिटेज वाईन म्हणून विक्रीला देखील परवानगी दिली आहे. आदिवासी युवकांना या बाबत स्किल डेवलपमेंट योजनेतून प्रशिक्षण देण्यात येत आहे. असे 700 पेक्षा जास्त आदिवासी युवक तयार झाले आहेत, असे शिवराज सिंग चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

    Congress always felt freedom is given by one family only

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    तेराव्या बॉम्बस्फोटाची स्टोरी मुंबई “वाचवण्यासाठी”; दोन माणसांच्या भेटीची स्टोरी राहुल गांधींना बातम्यांच्या केंद्रस्थानावरून हटविण्यासाठी??

    Strategic Balance : भारताने अमेरिकेशी संरक्षण सामग्री करार चर्चा थांबवली नाही, पण मोदी – पुतिन यांच्यातही चर्चा!!

    India : रिपोर्ट- भारत अमेरिकेकडून शस्त्रे-विमाने खरेदी करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा वॉशिंग्टन दौरा रद्द