• Download App
    काँग्रेसचा आरोप : स्मृती इराणींच्या मुलीचा गोव्यात अवैध बार, इराणींचे प्रत्युत्तर- माझी मुलगी कॉलेजला जाते, बार चालवत नाही|Congress allegation Smriti Irani's daughter's illegal bar in Goa, Irani's reply - My daughter goes to college, does not run a bar

    काँग्रेसचा आरोप : स्मृती इराणींच्या मुलीचा गोव्यात अवैध बार, इराणींचे प्रत्युत्तर- माझी मुलगी कॉलेजला जाते, बार चालवत नाही

    वृत्तसंस्था

    मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध परवान्यावर बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इराणींनी काँग्रेसचा हा आरोप फेटाळून लावला. माझी मुलगी १८ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. ती बार चालवत नाही. माझ्या मुलीचे चारित्र्यहनन व माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने हे आरोप केल्याचे सांगून काँग्रेसला न्यायालयात खेचण्याचा इशारा इराणींनी दिला आहे.Congress allegation Smriti Irani’s daughter’s illegal bar in Goa, Irani’s reply – My daughter goes to college, does not run a bar

    गेल्या लोकसभा निवडणुकीत इराणींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. त्यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली होती. स्मृती म्हणाल्या, “काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी पेपर दाखवून माझी मुलगी बार चालवत असल्याचा आरोप केला. हे सर्व काँग्रेस नेतृत्वाच्या इशाऱ्यानुसार होत आहे. खेरांनी माझ्या मुलीला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. यासाठी ते जे दस्तऐवज दाखवत आहेत, त्यात माझ्या मुलीचे नाव आहे का? काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही माहिती हक्काचा दाखला देत माझ्या मुलीवर आरोप केल्याचा दावा केला आहे. त्यातही माझ्या मुलीचे नाव आहे का?’



    जोइश इराणीवर हा आरोप

    स्मृतींची कन्या जोइशवर “सिली सोल्स कॅफे अँड बार’ नावाचे रेस्तराँ चालवण्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या बारचा परवाना अनधिकृत आहे. त्याच्या मालकाने परवान्याचे नूतनीकरण केले नाही. कारण त्याचा १३ महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वकील एरेज रोड्रिग्ज यांनी तक्रार दाखल केली होती, असा दावा काँग्रेसने केला आहे.

    Congress allegation Smriti Irani’s daughter’s illegal bar in Goa, Irani’s reply – My daughter goes to college, does not run a bar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी